Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वप्न राहिले अधुरे! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू; ‘या’ ठिकाणी घडला अपघात

Accident News: महामार्गांवर रस्त्याच्या कडेला अनेकदा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्या कधी रिकाम्या तर कधी रस्त्याच्या अक्षरशः कडेला उभ्या केलेल्या असतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2025 | 06:51 PM
स्वप्न राहिले अधुरे! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू; 'या' ठिकाणी घडला अपघात

स्वप्न राहिले अधुरे! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू; 'या' ठिकाणी घडला अपघात

Follow Us
Follow Us:

पिंपळगावच्या युवकाचे पोलिस भरतीचे स्वप्न अधूरे
पिंपळगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू 
भरधाव जाणाऱ्या  गाडीने तरुणाला चिरडले

केडगाव: भरधाव हायवा ट्रकने दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहू वाघोली मार्गावर घडली.
निलेश मारुती चव्हाण (वय २७, रा. पिंपळगाव,ता दौंड) असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे  नाव आहे.  दौंड तालुक्यातील कदम पाटील पेट्रोल पंप नजीक  पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास  निलेश चव्हाण हा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर बैलगाडीला ओव्हरटेक करून पुढे गेला असता, शेजारून भरधाव जाणाऱ्या गाडीने त्याला (Crime) चिरडले.  त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला.

अपघातानंतर नीलेशला त्वरित यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासंदर्भात सौरभ मंडले यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीमधील माहितीनुसार नीलेश हा खुटबाव येथील एका खासगी कंपनीत कामाला होता.गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी निलेश खाजगी काम करून मागील अनेक दिसांपासून पोलीस भरतीचा सराव करत होता. नीलेशचे अन कुटुंबाचे  स्वप्न बेचिराख झाले .कंपनीच्या कामानिमित्त ( दि.२३) बाहेरगावी गेला होता. मात्र वाघोली-पारगाव रस्त्याने पिंपळगावकडे दुचाकी क्रमांक (एम एच ४२ बी.डी. ९६१७) येत असताना त्याचा हा अपघात झाला. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अज्ञात वाहन चालकाविरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास यवत पोलिस करत आहे.

सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष

रस्त्यालगत उभ्या  केलेल्या चारचाकी  अन् ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना रेडियम (रिफ्लेक्टर) चिकटवलेले नसल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. महामार्गांवर रस्त्याच्या कडेला अनेकदा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्या कधी रिकाम्या तर कधी रस्त्याच्या अक्षरशः कडेला उभ्या केलेल्या असतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वेड्यावाकड्या अवस्थेत उभ्या असतात त्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

नागरीक त्रस्त; प्रशासन सुस्त

रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपूर्ण रस्ते , रखडलेल्या मोऱ्या आणि पुलाची कामे यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. फुटलेल्या पाइपलाइन मुळे रस्त्यावर चिखल आणि साचलेले पाणी यामुळे वाहन चालवणे अवघड झाले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Web Title: Baramati pimpalgaon accident death preparation police bharati crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • Accident Death
  • baramati
  • crime news

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.