Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत भरदिवसा दरोडा! रिव्हॉल्व्हरच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले; बारामती तालुका पोलिसांकडून टोळीला फिल्मी स्टाईल बेड्या

Baramati Crime: बारामती तालुका पोलिसांनी फेसबुकवर स्वस्त गव्हाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. थरारक पाठलाग करून ४ आरोपींना अटक केली असून पिस्तूल आणि मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 05, 2026 | 08:17 PM
बारामतीत भरदिवसा दरोडा! रिव्हॉल्व्हरच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले; बारामती तालुका पोलिसांकडून टोळीला फिल्मी स्टाईल बेड्या
Follow Us
Close
Follow Us:

 

  • बारामतीत भरदिवसा दरोडा!
  • रिव्हॉल्व्हरच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले
  • बारामती तालुका पोलिसांकडून टोळीला फिल्मी स्टाईल बेड्या
बारामती/प्रतिनिधी: बनावट फेसबुक अकाउंट वरून स्वस्त दरात गहू देण्याच्या आमिषाने व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण करून रोख रक्कम व दागिने लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत धडाकेबाज कामगिरी केली आहे. रवी संजय माने (वंजारवाडी, बारामती), श्रीकांत अर्जुन घुले (ढेकळवाडी, बारामती), अभिषेक भाऊसो ठोंबरे (ढेकळवाडी, बारामती), अतुल मोहन भोलणकर (वंजारवाडी, बारामती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तासगाव (जि. सांगली) येथील सूरज सरजेराव गावडे (वय २७) हे गव्हाच्या पिठाच्या व्यवसायात कार्यरत आहेत. फेसबुक मार्केटप्लेसवर “बाजारभावापेक्षा स्वस्त गहू” अशी जाहिरात पाहून त्यांनी संबंधित लिंकवर आपली माहिती भरली. त्यानंतर त्यांना खोट्या फेसबुक अकाउंट वरून फेसबुक ऑडिओ कॉल वरून संपर्क साधण्यात आला आणि बारामती येथे येण्यास सांगण्यात आले. ४ मे २०२६ रोजी गावडे हे आपल्या छोटा हत्ती टेम्पो व चालकासह बारामती येथे पैसे घेऊन दाखल झाले. फोनवरील सूचनांनुसार त्यांना बारामती शहरातील पेन्सिल चौक, त्यानंतर कल्याणी कॉर्नर येथे बोलावण्यात आले.

पियाजिओ कंपनीच्या मागील बाजूस निर्जन प्लॉटमध्ये या व्यापाऱ्याला नेण्यात आले. येथे आधीच चारचाकी वेरना गाडी मध्ये इतर आरोपी थांबलेले होते. निर्जन ठिकाणी पोहोचताच एका उंच इसमाने हातात पिस्तूल घेत गावडे यांच्या कपाळावर ठेवली, तर दुसऱ्याने चालकाच्या कपाळावर बंदूक रोखली. दोघांनाही शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपींनी जबरदस्तीने गावडे यांच्या खिशातील २५,५०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. तसेच त्यांच्या हातातील चांदीच्या दोन अंगठ्या, घड्याळ आणि चालकाच्या कानातील सोन्याची बाळी कटरने काढून घेतली. एकूण सुमारे ५१,५०० रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. “पोलिसांना सांगितले तर जिवे मारू” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक सायंकाळी ५.२५ वाजता तात्काळ रवाना झाले. विशेष म्हणजे, अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींबाबत माहिती पोलिसांनी घेतली. त्या आधारे एक संशयित असल्याबाबतची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. फिर्यादीला फोटो दाखविल्यानंतर एका आरोपीची ओळख पटली आणि तपासाला वेग आला. सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली. सुरुवातीला आरोपी उंडवडी परिसरात असल्याचे दिसून आले. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासात त्यांची वेरना कार पाटसच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आरोपीं वेळोवेळी रस्ते बदलत राहिले शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी, खडकी, रावणगाव, कुरकुंभ, भिगवण, निरगुडे, लाकडी, कळस, डाळज, भाडलवाडी अशा विविध ठिकाणी ते फिरत होते. पोलिसांनी या प्रत्येक ठिकाणी समन्वय साधून जाळे आवळले.

Beed Crime: बीड हादरलं! धारूरमध्ये पोलिसांवर भीषण दगडफेक; पोलीस उपनिरीक्षक भवर जखमी

बारामती तालुका पोलिसांच्या टीमवर्कची झलक

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.वालचंदनगर, भिगवण आणि बारामती तालुका पोलिसांसह सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत आरोपींना पकडले. विविध ठिकाणी नाकाबंदी, पाठलाग आणि माहितीची देवाणघेवाण यामुळे ही कारवाई यशस्वी ठरली.

ही धडाकेबाज कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, साहेब पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत, पोलीस हवालदार भारत खारतोडे, नितीन ढवण, जितेंद्र शिंदे, शशिकांत दळवी, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, संतोष कांबळे, आफ्रिन शेख, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे, पोलीस हवालदार गणेश काटकर, किसान बेलदार, अभिजित कळसकर, विक्रम मोरे, भिगवन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस हवालदार महेश उगले, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक फौजदार गोरख पवार आदींचा कारवाई सहभाग होता.

पोलीस निरीक्षक यादव यांच्याकडून इंदापूर, भिगवण, वालचंदनगर पोलिसांना सतर्क करून रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली. पोलिसांनी आरोपींची गाडी पाहिली; मात्र त्यांनी गाडी न थांबवता पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी आरोपींनी गाडीचा वेग आणखी वाढविला. त्यानंतरही पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

थरारक पाठलाग करून अटक

सिन्नरमास कंपनीजवळ समोरून भिगवण पोलिस आणि मागून वालचंदनगर व बारामती पोलिसांनी घेराव घालत पाठलाग तीव्र केला. अखेर रात्री सुमारे ८.५० वाजता तीन आरोपींना गाडीसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौथा आरोपी अतुल भोलणकर याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ७,५०,००० रु चे सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ, जिवंत काडतूस सह दोन पिस्तूल, ६५,००० रु रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दौंड हादरलं! शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग अनावर; बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या

Web Title: Baramati taluka police arrest gang robbing merchant via facebook scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • baramati
  • crime news

संबंधित बातम्या

चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल
1

चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल

आंघोळ करतानाचे ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर…
2

आंघोळ करतानाचे ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर…

फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल…
3

फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल…

कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यक फरार; शोधासाठी पोलिसांची दोन पथके नियुक्त
4

कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यक फरार; शोधासाठी पोलिसांची दोन पथके नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.