Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल

Baramati Crime: बारामतीतील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये पत्नीने नवऱ्याला औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर बॅटने मारहाण करत घरातील चौकोनी कट्ट्यात जिवंत पुरण्याचा कथित प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2026 | 03:53 PM
पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-ChatGPT)

पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • गुंगीचे औषध देऊन मारहाण करून पतीला जीवंत पुरण्याचा प्रकार
  • पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल
  • बारामतीतील थरारक घटना
बारामती : नवऱ्याला औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर बॅटने मारहाण करून घरातच बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील जामदार रोड परिसरात असलेल्या इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी पत्नीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रकाश कान्होबा जगताप (वय ७१, रा. ढाकाळे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून शर्मिला प्रविण जगताप (वय ३८, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) हिच्याविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाणे भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार

दृश्यम चित्रपटातील कथानका प्रमाणे घडलेल्या या घटनेमुळे बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै २०२६ रोजी रात्री ११.३० ते १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० या कालावधीत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. फिर्यादी प्रकाश जगताप यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी महिलेने पती प्रविण प्रकाश जगताप (वय ४१) यांना कोणतेतरी औषध देऊन अर्धबेशुद्ध केले. त्यानंतर त्यांना बॅटने मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने घरातील हॉललगतच्या गॅलरीत बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात बेशुद्ध अवस्थेत झोपवून तो कट्टा कडप्पा फरशीने बंद करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी ५ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार नवनाथ नलावडे यांनी गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगवले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

परप्रांतीय गवंड्यामुळे प्रकार उघडकीस

पती प्रवीण जगताप यांना औषध देऊन पत्नी शर्मिला जगताप हिने औषध देऊन बेशुद्ध केले, त्यानंतर त्यांच्या डोक्यात बॅटने मारहाण करून, त्यांना घरातील हॉललगत बांधलेल्या गॅलरीत बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात पुरून त्यावर सिमेंट लावले, यानंतर बिहारी गवंड्यांना बोलावून त्या कट्ट्यावर कडप्पा फरशी बसवण्यास सांगितले. बिहारी गवंड्याने कडप्पा बसवत असताना, अचानक जखमी अवस्थेत असलेल्या प्रवीण जगताप यांचा पाय हलल्याने, आतील बाजूस जखमी अवस्थेत एक व्यक्ती असल्याचे बिहारी लोकांच्या लक्षात आले, त्यांनी तातडीने तिथून पळ काढून बारामती शहर पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात सदर प्रकार सांगितल्यानंतर, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तातडीने त्यांनी सदर कट्ट्यात अर्धबेशुद्ध असलेल्या प्रवीण जगताप यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी हा प्रकार पोलिसांसह त्यांच्या वडिलांना सांगितला. त्यांनी पोलिस ठाण्यात शर्मिला जगताप हिच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. दरम्यान आरोपी शर्मिला जगताप हिचा मेडिकल औषध विक्रीचा व्यवसाय आहे. पती प्रवीण जगताप हे भारत फोर्ज या कंपनीत नोकरीस असून त्यांना दोन अपत्य आहेत.

पुण्यातील वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार, 22 तोळे सोने लुटून आरोपी पसार; नेमकं काय घडलं?

Web Title: Baramati wife attempts to bury husband alive after drugging him case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • baramati
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
3

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.