Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात सावकारीच्या त्रासाला कंटाळून 22 वर्षीय धर्मराज बडे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. संतप्त नातेवाईकांनी दिंद्रुड पोलीस ठाणे समोर ठिय्या आंदोलन केले. गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 10:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ५० हजार रुपये व्याजाने घेतल्याचा व्यवहार
  • सावकारांकडून तगादा व अपमानास्पद भाषेचा आरोप
  • मानसिक तणावातून शेतातील झाडाला गळफास
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकारीच्या त्रासामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहसह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घडली.

काय नेमकं प्रकरण?

धर्मराज बडे (22) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. धर्मराज बडे यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब कांबळे यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी कांबळे हे बडे यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी पैशांसाठी तगादा लावत कुटुंबीयांविषयी अपमानास्पद व अश्लील शब्द वापरल्याचा आरोप आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! सावत्र वडिलाकडून 7 वर्षीय मुलीवर अश्लील कृत्य; कपडे काढले आणि…

या प्रकारामुळे धर्मराज बडे मानसिक तणावात होते. अखेर त्यांनी शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्र त्यांनी घेतला होता.

गुन्हा दाखल

जवळपास चार ते पाच तास पोलीस ठाण्यासमोर तणावपूर्ण वातावरण होते. अखेर या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी बाळासाहेब कांबळे, कांताबाई कांबळे आणि भागवत वेताळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

बीडच्या आष्टी तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. रूईनालकोलमध्ये सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी, स्टेटस टाकण्याच्या कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा समोर आले आहे. या हल्ल्यात एकाच मृत्यू झाला असून दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘लोक काय म्हणतील?’ भीतीतून आईनेच 20 वर्षीय मुलीची केली हत्या; काय प्रकरण नेमकं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येचे कथित कारण काय?

    Ans: सावकारीच्या पैशांसाठी होत असलेला तगादा व अपमानास्पद वर्तन.

  • Que: नातेवाईकांनी काय भूमिका घेतली?

    Ans: गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्र घेत ठिय्या आंदोलन केले.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: संबंधित सावकारांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

Web Title: Beed crime 22 year old youth commits suicide due to pressure from moneylenders relatives sit in front of the police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.