काय नेमकं प्रकरण?
मृत तरुणीचे नाव नंदिनी राजू धिवरे (वय २०) असे आहे. तर आरोपी आईचे नाव भरती उमेश साबळे (वय ३५) असे आहे. तर सावत्र वडील उमेश गोविंद साबळे(वय 40, रा. वडगाव कोल्हाटी) पोलिसांनी यांना ताब्यात घेतले आहे. मृत नंदिनीने काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीचा संसार सुरळीत सुरु असला तरी दोन-तीन महिन्यांपूर्वी पतीने तिला सोडून दिले. त्यानंतर ती माहेरी परतली. या घटनेचा तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.
पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या; थेट दगडानेच हल्ला चढवला
लोक काय बोलतील?
यानंतर तिचे दुसऱ्या एका तरुणाशी संबंध जुळले. हे तिच्या आईला आणि सावत्र वडिलांना समजताच घरात वारंवार वाद होत होते. ‘समाजात बदनामी होईल, लोक काय बोलतील?’ या भीतीने आई संतप्त होती. सुमारे वीस दिवसांपूर्वी आई-मुलगी वडगाव कोल्हाटी येथे राहायला आल्या होत्या. घटनेच्या दिवशी दुपारी अंदाजे 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये प्लास्टिक पाईपने गळा आवळून नंदिनीची हत्या केली. त्यांनतर मृतदेह गाडीत गुंडाळण्यात आला. रात्री सुमारे 10.40 वाजता संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता गादीत गुंडाळलेला नंदिनीचा मृतदेह आढळला.तपासात मृतदेह कन्नड घाट परिसरात नेऊन ड्रममध्ये टाकून जाळून पुरावे नष्ट करण्याचा कट रचण्यात आल्याचेही समोर आले आहे.
दोघांना अटक
वडगाव कोल्हाटी येथील काही शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरातून नेहमी भांडणांचे आवाज येत असत; मात्र परिस्थिती इतकी टोकाला जाईल, याची कल्पना कोणालाही नव्हती. आई भारती साबळे हिने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या घडली त्या वेळी सावत्र वडील उमेश साबळे घराबाहेर असल्याचे सांगितले जात असले, तरी नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून आता आणखी काही समोर येते का याचा देखील तपास करत आहे.
पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; कारण काय तर…
Ans: वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव चौफुली येथे रिक्षात.
Ans: मुलीच्या नातेसंबंधांमुळे घरात वाद होत होते; ‘समाजात बदनामी होईल’ या भीतीतून गुन्हा केल्याचे तपासात समोर आले.
Ans: बाथरूममध्ये प्लास्टिक पाईपने गळा आवळून.






