Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीड हादरलं! तक्रार मागे घेण्यासाठी तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; शिवसेना माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांवर गुन्हा

बीडमध्ये तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत सात जणांनी एका तरुणावर कुऱ्हाडी व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल असून जखमीवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 15, 2026 | 03:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तक्रार मागे घेण्यासाठी तरुणावर सात जणांचा हल्ला
  • कुऱ्हाड व काठ्यांनी मारहाण; तरुण गंभीर जखमी
  • माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
बीड: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.

काय घडलं नेमकं?

जुन्या वादातून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या आधारे संबंधितांवर पोलीसांनी गुन्हा नोंद केला होता. ती तक्रार आणि गुन्हा मागे घ्यावा यासाठी संबंधित व्यक्ती तक्रारदारावर सातत्याने दबाव आणत होते. याच प्रकरणातून बीडच्या म्हाळसजवळा गावातील एका तरुणाला सात जणांनी काठ्या कुऱ्हाडीने जबर मारहाण केली. या प्रकरणात प्रभाकर खांदे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

Sangli Crime: आंतरजातीय विवाहाचा भयानक शेवट! चारित्र्य संशयातून पतीने 20 वर्षीय पत्नीची लोखंडी रॉडने हत्या

प्रभाकर खांडे याच्या भावाबरोबर कुंडलिक खांडे आणि त्याच्या साथीदारांचे यापूर्वी वाद झाले होते. त्यातून गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी संबंधित तरुणावर सातत्याने दबाव आणला जात होता, असा दावा तक्रारदाराने केला आहे. आरोपींनी यापूर्वीही ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर देखील हल्ला केला होता, अशी माहिती आहे.या प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. .

नात्याला काळिमा! आई माहेरी गेली आणि घडलं भयंकर; नराधम सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

बीड जिल्ह्यातील केज शहरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम सावत्र पित्याने आपल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.

Dhule Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांचा अतिरेक; अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: जुना वाद आणि दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव.

  • Que: हल्ल्यात कोण जखमी झाला?

    Ans: प्रभाकर खांडे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed crime beed shaken life threatening axe attack on youth to force withdrawal of complaint case registered against 7 individuals including former shiv sena district chief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले
2

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद
4

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.