Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ‘कार्यक्रम ओके’ कॉलने उलगडलं हत्याकांड; प्रियकरासोबत पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट

बीडच्या लिंबागणेश परिसरातील किरण सोनवणे हत्याकांडात धक्कादायक खुलासा झाला आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात पत्नी प्रियंका सोनवणे हिने प्रियकर दशरथ परदेशी आणि साथीदार धीरज येडे यांच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 09, 2026 | 11:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकरासोबत पतीच्या खुनाचा कट रचला
  • गळा आवळून हत्या करून मृतदेह अपघातासारखा दाखवण्याचा प्रयत्न
  • कॉल रेकॉर्ड आणि शवविच्छेदन अहवालामुळे पोलिसांना मिळाला महत्त्वाचा पुरावा
बीड: बीड येथून एक थरारक हत्याकांड समोर आले आहे. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्यात आले मात्र पोलिसांच्या सखोल तपासातून या घटनेचा उलगडा केला आहे. विवाहबाह्य संबंधातून पत्नीनंच पतीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.

काय नेमकं प्रकरण?

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव किरण सोनवणे असे आहे. किरण आणि प्रियांका यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. काही काळानंतर कौटुंबिक वाद वाढत गेले आणि त्यातून प्रियांका व किरणचा मित्र दशरथ परदेशी यांच्यात जवळीक निर्माण झाली. गेल्या काही महिन्यांपासून प्रियांका आणि दशरथ दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु होते. याच दरम्यान पतीपासून वेगळं होण्यासाठी दोघांनी मिळून हत्येचा कट रचला. या कटात धीरज येडे यालाही सामील करण्यात आले.

Akola News: NEET पेपरफुटीच्या तणावातून होतकरू विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; अकोल्यातील घटना

अपघात असल्याचा भासवलं

घटनेच्या रात्री आरोपींनी किरणला दारू पाजली. नशेत दशरथ किरणला सोबत घेऊन एका गाडीवर तर धीरज दुसऱ्या गाडीवर निघाले. निर्जन ठिकाणी गाडी थांबवून दशरथने कीरांच्याच रुमालाने त्याचा गळा आवळला. मृत्यूची खात्री झाल्यानंतर आरोपींनी हा प्रकार अपघातासारखा भासावा यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला ठेवला. तसेच त्यावर दुचाकी टाकले.

‘कार्यक्रम ओके’ 

यांनतर आरोपी दशरथ आणि प्रियांका यांच्यात फोनद्वारे संपर्क केले. ‘कार्यक्रम ओके’ म्हणून कट यशस्वी झाल्याची माहिती या संभाषणातून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कॉलच्या आधारे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. दरम्यान, आरोपी धीरज याने स्वतःच्या वाहनातून मृतदेह रुग्णालयात नेण्यास मदत केल्याची बाब समोर आली आहे.

आरोपी अटकेत

मात्र शवविच्छेदन अहवाल समोर आल्यांनतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शवविच्छेदन अहवालात गळ्यावर आढळलेल्या खुणांमुळे पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय आला होता. त्यानंतर तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्ड्स आणि अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली. दोन आरोपी फरार झाले होते. मात्र त्यांना पनवेल येथून अटक करण्यात आले. पुढील चौकशीत पत्नीचाही सहभाग उघड झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.

Hingoli Crime: निर्दयी कृत्य! पाच दिवसांच्या बाळाला झुडपात टाकून पळ काढला; पोलिसांचा तपास सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: किरण सोनवणे यांचा खून कसा करण्यात आला?

    Ans: आरोपींनी दारू पाजल्यानंतर किरणचा रुमालाने गळा आवळून खून केला.

  • Que: या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: पत्नी प्रियंका सोनवणे, प्रियकर दशरथ परदेशी आणि धीरज येडे यांना अटक करण्यात आली.

  • Que: पोलिसांना संशय कसा आला?

    Ans: शवविच्छेदन अहवालातील गळ्यावरील खुणा आणि कॉल रेकॉर्डमुळे पोलिसांना संशय आला.

Web Title: Beed crime karyakram ok call unravels murder case wife conspired with lover to kill husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.