Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: लग्नाचे आमिष, दोन वर्षे अत्याचार, धर्मांतराची अट घालून धमक्या; गुन्हा दाखल

बीडच्या अंबाजोगाई येथे 28 वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपीने नंतर धर्मांतराची अट घालत धमक्या दिल्या. तक्रारीवरून गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 08:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार
  • विवाहासाठी धर्मांतराची अट आणि धमक्या
  • गुन्हा दाखल; आरोपी फरार, पोलीस तपास सुरू
बीड: बीडच्या अंबाजोगाई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तिला धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही अशी अट घातली. पीडित मुलीने या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव सलमान अजीज पठाण असे आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपी सलमान अजीज पठाण यांनी तिला लग्नाचे स्वप्न दाखवून दोन वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेने लग्नाचा विषय काढला त्यावेळी आरोपीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही अशी अट घातली. एवढेच नाही तर ‘तुला काय करायचे आहे ते कर’ असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी ही दिली.

कोरेगाव पार्क परिसरात तरुणावर हल्ला; गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला अन्…

या धमकीला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 69, 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी सलमान हा फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान धर्मांतरासाठी दबाव आणण्याच्या या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

बीड हादरलं! तक्रार मागे घेण्यासाठी तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; शिवसेना माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.

काय घडलं नेमकं?

जुन्या वादातून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या आधारे संबंधितांवर पोलीसांनी गुन्हा नोंद केला होता. ती तक्रार आणि गुन्हा मागे घ्यावा यासाठी संबंधित व्यक्ती तक्रारदारावर सातत्याने दबाव आणत होते. याच प्रकरणातून बीडच्या म्हाळसजवळा गावातील एका तरुणाला सात जणांनी काठ्या कुऱ्हाडीने जबर मारहाण केली. या प्रकरणात प्रभाकर खांदे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

प्रभाकर खांडे याच्या भावाबरोबर कुंडलिक खांडे आणि त्याच्या साथीदारांचे यापूर्वी वाद झाले होते. त्यातून गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी संबंधित तरुणावर सातत्याने दबाव आणला जात होता, असा दावा तक्रारदाराने केला आहे. आरोपींनी यापूर्वीही ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर देखील हल्ला केला होता, अशी माहिती आहे.या प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Dharashiv Crime: मध्यस्ती करायला गेला, जीव गमावला! जमिनीच्या वादातून काकाने पुतण्यावर सपासप वार करत हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे.

  • Que: पीडितेने काय आरोप केले?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार आणि नंतर धर्मांतरासाठी दबाव.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Beed crime lured with marriage subjected to abuse for two years threatened with conversion demand case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Crime News: LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या
1

Crime News: LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
2

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
3

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
4

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.