काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सुजित ज्ञानेश्वर शेळके असे आहे. तर आरोपीचे नाव विलास शिवाजी शेळके असे आहे. आरोपी हा आपल्या आई- वडिलांशी जमिनीच्या वादातून सतत वाद घालत होता आणि मारहाण देखील करत होता. या घटनेदरम्यान पुतण्या सुजितने मारहाण करतांना मध्यस्थी केली.
त्याने संतापाच्या भरात ‘तुला जमीन देणार नाही’, तू जास्त माजलास का?’ असे म्हंटले. यामुळे आरोपी विलास याने त्याच्यावर हल्ला चढवला. चाकूने सपासप वार केले. यात सुजित गंभीर जखमी झाला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
Uttarpradesh Crime: 4 वर्षीय सख्या भाचीवर मामानेच केला अत्याचार नंतर…; पोलिस चकमकीत आरोपी ठार
या प्रकरणी सुजितची आई मनीषा शेळके यांच्या फिर्यादीवरून शिरढोण पोलीस ठाणे परिसरात आरोपी विलास शेळके विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेची तपासणी पोलीस करत आहे.
परंड्यात तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे तहसीलदारांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कर्तव्यावर असताना अधिकाऱ्यांनाच अडवून दमदाटी करण्यात आल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार निलेश मारुती काकडे (वय ३२, रा. शासकीय निवासस्थान, तहसील कार्यालय परिसर, परंडा) हे बुधवार १५ एप्रिलला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीस दवाखान्यात नेत असताना ही घटना घडली.
यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात योगेश मेटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) आणि त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी काकडे यांची गाडी अडवली. माझ्या निवेदनावर कारवाई का केली नाही? आत्ताच्या आत्ताच माझ्या अर्जावर कारवाई कर, असा दम देत दोघांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. यावेळी त्यांनी तहसीलदारांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, या घटनेमागे अवैध वाळू उपसा आणि वाळू माफियांचा अँगल असल्याचेही बोलले जात असून, याच कारणामुळे हा गंभीर प्रकार घडल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
Mumbai: काशिमिरा उड्डाणपुलाखालील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा
Ans: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात.
Ans: जमिनीच्या वादातून निर्माण झालेला संताप.
Ans: आरोपी काकाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.






