Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, एसआयटीने हत्येत वापरलेला चाकू आणि स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2026 | 09:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी कुटुंबीयांचे आंदोलन.
• पोलिसांच्या आश्वासनानंतर पाण्याच्या टाकीवरील आंदोलन स्थगित करण्यात आले.
• एसआयटीने तपासात चाकू आणि आरोपींनी वापरलेली स्कॉर्पिओ जप्त केली.

बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. सर्व आरोपींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी घुले कुटुंबीयांनी बुधवारी सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं. आंदोलनस्थळी गावकऱ्यांनीही ठिय्या देत कुटुंबाला पाठिंबा दिला. अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.

काय नेमकं प्रकरण?

विलास घुले हा एक हॉटेल व्यावसायिक होता, दोन गटात भांडण सुरू होते, त्यामुळे तो मध्यस्थी करण्यासाठी गेला होता, त्यावेळी आरोपीने त्याच्यावरच हल्ला केला. धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्यामुळे या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. सर्व आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता स्थगित करण्यात आले.

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

विलास घुलेंच्या पत्नीला भोवळ

या आंदोलनात विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले तसेच घुले कुटुंबातील महिला देखील या आंदोलनात सहभागी होत्या. हे आंदोलन गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीजवळ ठिय्या सुरु केला होता. आंदोलना दरम्यान मयत घुले यांच्या पत्नीला भोवळ देखील आली त्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी दाखल होत कारवाईचे आश्वासन दिले. यामध्ये सोशल मीडियातून होणारी बदनामी थांबवण्याबरोबरच उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी देखील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आश्वासनाप्रमाणे कारवाई न झाल्यास यापुढे आम्ही आंदोलन करणार असल्याचे रमेश घुले यांनी सांगितले.

स्कॉर्पिओ आणि चाकू जप्त

विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि चाकू एसआयटीकडून जप्त करण्यात आला आहे. चाकू हा आरोपीच्या शेतातून एसआयटीने जप्त केला आहे. दरम्यान आता विलास घुले हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा एसआयटीच्या हाती लागल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सैरव सोनवणे याच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सैरव सोनवणे याची एसआयटीकडून चौकशी देखील करण्यात आली आहे.

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: विलास घुले हत्या प्रकरणात आंदोलन का करण्यात आले?

    Ans: सर्व आरोपींवर कारवाई करून अटक करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

  • Que: आंदोलन कुठे करण्यात आले?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले.

  • Que: एसआयटीने कोणते पुरावे जप्त केले आहेत?

    Ans: एसआयटीने आरोपींची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

Web Title: Beed crime news family stages protest atop water tank over vilas ghule murder case police promise action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.