Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

महाराष्ट्र मधील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दहावीच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याचा आरोप. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला अटक केली. पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 10:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शनिवारी रात्री फूस लावून नेल्याचा आरोप
  • गावाबाहेरील शेतात अत्याचार
  • मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी अटकेत
बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

काय घडलं नेमकं?

समीर ताजोद्दीन शेख (वय 20, रा. सुर्डी-सोनेसांगावी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुलीला फूस लावून नेले. संबंधित आरोपी हा पिकअप वाहन चालक म्हणून काम करतो. मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी युसूफवडगाव पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर करून तपासाची दिशा ठरवली.

Chhatrapati Sambhajinagar: भरधाव कार कोसळली कालव्यात; पती-पत्नी बुडाले पाण्यात; चालक बचावला

सापळा रचत केली अटक

पोलिसांनी मोबाईल लोकेशंसह इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. रविवारी रात्री तो कळंब बस स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. आरोपीने चौकशीत मुलीला केजकडे जाणाऱ्या बसमध्ये बसविल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बस स्थानकातून मुलीला सुखरूप ताब्यात घेतले.

पीडितेच्या जबाबानुसार, तिला गावाबाहेरील ज्वारीच्या शेतात नेऊन अत्याचार करण्यात आल्याचे सांगितले.पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या समीर शेक याच्या विरुद्ध पोक्सो तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केला आहे. पोलिसांनी सोमवारी केज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने प्राथमिक सुनावणीनंतर आरोपीला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे चित्र वाढत असल्याचे समोर आले आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. सासरच्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ही घटना बीडच्या अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या चनई येथे घडली.

Karad News : उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी; तब्बल अडीच लाखांच्या रकमेसह सोन्या-चांदीची बॅगही लंपास

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला कसे पकडले?

    Ans: मोबाईल लोकेशन व तांत्रिक तपासाच्या आधारे.

  • Que: कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल?

    Ans: पोक्सो व अॅट्रॉसिटी कायदा.

  • Que: सध्या प्रकरणाची स्थिती काय?

    Ans: आरोपी पोलिस कोठडीत; पुढील तपास सुरू.

Web Title: Beed crime outrageous incident in beed seduced and taken to a field tortured and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.