Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: धक्कादायक! शाळेबाहेर विद्यार्थ्याला टोळक्याची बेदम मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

बीडच्या शिरूर तालुक्यात अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर विद्यार्थ्याला पाच–सहा विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. व्हिडिओ व्हायरल झाला असून कारण अस्पष्ट आहे. गुन्हा दाखल नसल्याने पालकांमध्ये भीती वाढली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 26, 2025 | 12:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अपंग मतिमंद विद्यालयाबाहेर विद्यार्थ्यावर टोळक्याची मारहाण.
  • व्हिडिओ व्हायरल पण पोलिसांकडे अद्याप गुन्हा दाखल नाही.
  • पालकांची आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शालेय विध्यार्थ्यांच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून विध्यार्थीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या विध्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या मारहाणीचा व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह येथील अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेट बाहेर घडली.

Mumbai Crime: मुंबईत वाढदिवसाचा थरार! केक कापला, आधी अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून…

गुन्हा दाखल नाही

याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ आहे. पीडित विद्यार्थीला कोणत्या कारणातून मारहाण करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही आहे.

बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच; शालेय विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांच्याच टोळक्याकडून बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल#Beednews #Crimenews #Videoviral pic.twitter.com/pWk46aGKgb — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 26, 2025

बिड जिल्ह्यातून सतत मारहाण, हत्या, गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. आता शाळेच्या बाहेरच विध्यार्थीवर मारहाण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नाही आहे. आता पोलीस काय कारवाई करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नात्यातील मुलाकडून साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गावकऱ्यांनी गुन्हा दडपण्याचा केला प्रयत्न

बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. साडेपाच वर्षीय चिमुरडीवर नात्यातीलच एका मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी बदनामीच्या भीतीने पीडितेच्या आईवर गुन्हा दडपण्याचा दबाव आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणाची हत्या; चाकूने भोसकून रक्ताच्या थारोळ्यात लोळवलं अन्….

नेमकं काय घडलं?

११ नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडली. परंतु, घटनेनंतर तब्बल चार दिवस गावातील लोकांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात जाऊ दिले नाही. बदनामी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी चक्क बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत चिमुरडी अतोनात वेदना सहन करत होती. तिच्या नात्यातील काही व्यक्तींना ही गंभीर बाब समजल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

चार दिवसांच्या विलंबानंतर अखेर मुलीच्या आईने सर्व दबाव झुगारून उपचारासाठी बीड येथील सरकारी रुग्णालयात धाव घेतली. पीडित चिमुरडीवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: शिरूर तालुक्यातील रायमोह येथील अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर.

  • Que: विद्यार्थ्याला मारहाण का करण्यात आली?

    Ans: मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • Que: पोलिसांनी कारवाई केली का?

    Ans: आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही; कारवाईची प्रतीक्षा आहे.

Web Title: Beed crime student brutally beaten by a gang outside the school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मुंबईत वाढदिवसाचा थरार! केक कापला, आधी अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून…
1

Mumbai Crime: मुंबईत वाढदिवसाचा थरार! केक कापला, आधी अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून…

Nagpur Crime: काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त; भाजप युवा मोर्चा पदाधिकारीसह सहा जणांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
2

Nagpur Crime: काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त; भाजप युवा मोर्चा पदाधिकारीसह सहा जणांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Raigad Crime: नेरळमध्ये गोळीबार! 15 गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपीने सलग दोन गोळ्या झाडल्या; सचिन भवर थोडक्यात बचावले
3

Raigad Crime: नेरळमध्ये गोळीबार! 15 गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपीने सलग दोन गोळ्या झाडल्या; सचिन भवर थोडक्यात बचावले

Dombivali Crime: डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड; कोणी केली हत्या? कारण काय?
4

Dombivali Crime: डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड; कोणी केली हत्या? कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.