Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: लग्नानंतर मुलगी गर्भवती; रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक खुलासा

बीडच्या माजलगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीची तपासणी करताना ती गर्भवती असल्याचे उघड झाले. यानंतर पती, आई-वडील आणि सासरच्यांविरोधात पॉक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 09:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे तपासणीत उघड झाल्याने बालविवाहाचा पर्दाफाश.
  • पतीविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल.
  • मुलीच्या आई-वडिलांसह सासू-सासऱ्यांवरही पोलिसांची कारवाई.
बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर बायको गर्भवती राहिली. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन असून तिचा बाल विवाह लावून देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीवर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आली आहे.

काय नेमकं प्रकरण?

माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. या प्रकरणातील अल्पवयीन मुलीचा विवाह परभणी जिल्ह्यात लावून देण्यात आला होता. ९ जून रोजी या मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी दरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

Washim Crime: पत्नी आणि दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकललं; पतीचीही आत्महत्या, तिवळी गाव हादरलं

या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांनी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी तसेच सासू-सासऱ्यांनी विवाहाला सहकार्य केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एवढेच नाही तर मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने आणि ती गर्भवती झाल्याने तिच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलिस तसेच पिंक पथकाकडून करण्यात येत आहे.

‘मुलीचा अपघाती मृत्यू नाही, खूनच झाला’ कुटुंबीयांचा आरोप; हुंड्यासाठी छळानंतर विवाहितेचा मृतदेह विहिरीत सापडला

बीड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. तिचा मृत्यू अपघाती नसून हत्या आहे असा आरोप मृत्यू झालेल्या महिलेच्या माहेरच्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बीड तालुक्यातील कुटेवाडी येथे घडली.

इमारतीवरून उडी मारून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; सोबत असलेलं 6 महिन्यांचं बाळ सुखरूप

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: बालविवाहाचा प्रकार कसा उघड झाला?

    Ans: पोटदुखीमुळे मुलीला रुग्णालयात नेल्यानंतर तपासणीत ती अल्पवयीन आणि गर्भवती असल्याचे समोर आले.

  • Que: या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल झाला?

    Ans: मुलीचे आई-वडील, पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • Que: पतीवर कोणत्या कलमांखाली कारवाई झाली?

    Ans: पतीविरोधात बलात्कार तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beed crime woman pregnant after marriage shocking revelation during hospital check up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.