Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: पैशांच्या वादातून लिपिकाचे अपहरण, निर्जन स्थळी 8 तास डांबून बेल्ट-काठीने अमानुष मारहाण; जीवे मारण्याची धमकी

बीडच्या परळीत आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका लिपिकाचे अपहरण करून तिघांनी त्याला निर्जन स्थळी तब्बल आठ तास डांबून ठेवत बेल्ट आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केली. आरोपींनी आणखी 4 लाख रुपयांसाठी तगादा लावत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 11:41 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक व्यवहारातून लिपिकाचे अपहरण करून निर्जन स्थळी नेण्यात आले.
  • बेल्ट आणि काठ्यांनी तब्बल आठ तास अमानुष मारहाण करण्यात आली.
  • परळी शहर पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लिपिकाला निर्जन स्थळी नेत आठ तास डांबून ठेवत बेल्ट – काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आर्थिक व्यवहारातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना बीडच्या परळीत घडली. (Beed Crime News)

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित लिपिकाचे नाव अनिल पत्की असे आहे. तर महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. तर आरोपीचे नाव वैजनाथ यादव असे आहे. (Beed Crime News) त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. या व्यवहारापोटी पत्की यांनी यादव यांना १ लाख रुपये परत केले. वैजनाथ यादव यांनी आणखी चार लाख रुपयांसाठी तगादा लावला. थेट लिपिकाचे घर गाठले आणि गाडीवर बसवत धारावती तांडा परिसरातील निर्जन स्थळी एका झाडाखाली नेले. तिथे यादव यांच्या दोन साथीदारांनी बेल्ट आणि लाकडाच्या साह्याने बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर लिपिकाला पोलिसांकडे गेला तर जीवे मारण्याची धमकी दिली. ही मारहाण सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान करण्यात आली. या मारहाणीनंतर लिपिकाला आरोपीच्या दुकानासमोर सोडले आणि त्यांचा मोबाईल देखील घेतले असे फिर्यादीत म्हंटले आहे.

UP Crime : बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी

पाठीवरची चामडी सोलून निघाली

जवळपास ८ तास चालली मारहाण एवढी भीषण होती की त्यांच्या पाठीवर आणि शरीरावर सर्वत्र व्रण उमटले असून त्यांच्या पाठीवरची चामडी सोलून निघाली आहे. अतिशय निर्दयीपणे ही मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. (Beed Crime News) त्यांनी रुग्णालयात उपचार घेऊन सायंकाळच्या सुमारास परळी शहर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.(Beed Crime News)

‘कार्यक्रम ओके’ कॉलने उलगडलं हत्याकांड; प्रियकरासोबत पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट

बीड येथून एक थरारक हत्याकांड समोर आले आहे. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्यात आले मात्र पोलिसांच्या सखोल तपासातून या घटनेचा उलगडा केला आहे. विवाहबाह्य संबंधातून पत्नीनंच पतीचा काटा काढल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.

Solapur Crime: वीटभट्टी परिसरात दुर्गंधी, कुत्र्यांचा वावर अन् समोर आला कुजलेला मृतदेह; तुटलेल्या दातावरून पटली ओळख

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील परळी येथे ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: आरोपींनी लिपिकाला का मारहाण केली?

    Ans: आर्थिक व्यवहारातून आणखी 4 लाख रुपयांची मागणी करत आरोपींनी मारहाण केली.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: परळी शहर पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण, मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beed crime clerk abducted over a money dispute held captive at a secluded spot for 8 hours brutally beaten with a belt and stick and threatened with death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: वीटभट्टी परिसरात दुर्गंधी, कुत्र्यांचा वावर अन् समोर आला कुजलेला मृतदेह; तुटलेल्या दातावरून पटली ओळख
1

Solapur Crime: वीटभट्टी परिसरात दुर्गंधी, कुत्र्यांचा वावर अन् समोर आला कुजलेला मृतदेह; तुटलेल्या दातावरून पटली ओळख

Pune Crime: सहकारनगरात थरार! मेडिकलसमोर गोळीबार; तरुण जखमी, परिसरात भीतीचं वातावरण
2

Pune Crime: सहकारनगरात थरार! मेडिकलसमोर गोळीबार; तरुण जखमी, परिसरात भीतीचं वातावरण

Nashik Crime: पैसे आण नाहीतर…,पैशांसाठी विवाहितेचा छळ, अखेर शेततळ्यात उडी घेत जीवन संपवलं
3

Nashik Crime: पैसे आण नाहीतर…,पैशांसाठी विवाहितेचा छळ, अखेर शेततळ्यात उडी घेत जीवन संपवलं

Ratnagiri News: सुट्टीसाठी आले आणि काळाने घात केला; जगबुडी नदीत बुडून ३ भावांचा मृत्यू
4

Ratnagiri News: सुट्टीसाठी आले आणि काळाने घात केला; जगबुडी नदीत बुडून ३ भावांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.