Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: नात्यातील मुलाकडून साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गावकऱ्यांनी गुन्हा दडपण्याचा केला प्रयत्न

बीडमध्ये साडेपाच वर्षीय चिमुरडीवर नात्यातील मुलाकडून लैंगिक अत्याचार झाला. गावकऱ्यांनी बदनामीच्या भीतीने आईवर गुन्हा दडपण्याचा दबाव आणला आणि चार दिवस उपचारही रोखले. आईने दबावाला न जुमानता तक्रार दाखल केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 24, 2025 | 03:43 PM
अल्पवयीनवर शिक्षकाचा अत्याचार

अल्पवयीनवर शिक्षकाचा अत्याचार

Follow Us
Follow Us:
  • साडेपाच वर्षीय चिमुरडीवर नात्यातील मुलाकडून अत्याचार.
  • गावकऱ्यांनी गुन्हा दडपण्यासाठी आईवर दबाव; उपचारासाठीही रोखलं.
  • आईने थेट पोलीस अधीक्षकांना संपर्क करून गुन्हा दाखल केला.
बीड: बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. साडेपाच वर्षीय चिमुरडीवर नात्यातीलच एका मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी बदनामीच्या भीतीने पीडितेच्या आईवर गुन्हा दडपण्याचा दबाव आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Uttar Pradesh Crime: विवाहबाह्य संबंध, अनपेक्षित गर्भधारणा…, ३ मुलांच्या आईचा लग्नासाठी दबाव आणि भयंकर घडलं

नेमकं काय घडलं?

११ नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडली. परंतु, घटनेनंतर तब्बल चार दिवस गावातील लोकांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात जाऊ दिले नाही. बदनामी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी चक्क बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत चिमुरडी अतोनात वेदना सहन करत होती. तिच्या नात्यातील काही व्यक्तींना ही गंभीर बाब समजल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

चार दिवसांच्या विलंबानंतर अखेर मुलीच्या आईने सर्व दबाव झुगारून उपचारासाठी बीड येथील सरकारी रुग्णालयात धाव घेतली. पीडित चिमुरडीवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.

बालकल्याण समितीची भूमिका आणि मागणी

या प्रकरणातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे अत्याचार करणारा व्यक्ती हा पीडित मुलीचाच नात्यातील असल्याचे समोर आले. गावकऱ्यांनी बदनामी टाळण्यासाठी पीडित कुटुंबाला धमकावले. ही आपबीती सांगताना मुलीची आई हृदयविदारक अवस्थेत रडू लागली.

बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, पोस्को कायद्यानुसार गुन्हा तात्काळ नोंदवणे अत्यावश्यक आहे. गुन्हा नोंद करण्यात विलंब करणे हीसुद्धा कायदेशीर गुन्हा ठरतो. त्यामुळे शिरूर कासार पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कांबळे यांनी पुढे हेही सांगितले की, नातेवाईक आणि गावकरी दोघांनीही गुन्हा न दाखल करण्यासाठी आईवर प्रचंड दबाव टाकला होता, परंतु आईने हार न मानता तक्रार नोंदवली. त्यांनी एक वास्तवही सांगितले—“अशा 90 टक्के प्रकरणांत दबावामुळे पीडित कुटुंबांना पोलीस स्टेशनपर्यंत येऊ दिले जात नाही.”

ही घटना ग्रामीण भागातील मानसिकता, सामाजिक दबाव आणि मुलांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे करते. अशा प्रकरणात समाजाने पीडितेच्या पाठिशी उभे राहणे अत्यंत आवश्यक असून कायद्याने कठोर कारवाई करणं ही आता काळाची मागणी आहे.

Nagpur Crime: ऑनलाईन गेम्सचे व्यसन, परंतु पालकांनी मोबाईल देण्यास दिला नकार; १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिमुरडीवर अत्याचार कोणी केला?

    Ans: नात्यातील

  • Que: गुन्हा कोणत्या कायद्यानुसार नोंदला?

    Ans: POCSO

  • Que: आईवर दबाव कोणी आणला?

    Ans: गावकरी

Web Title: Beed crimefive and a half year old girl raped by relative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.