Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता लग्नाच्या खर्चावरून सुरू असलेल्या चर्चांवर सिया गोयलच्या वडिलांनी खुलासा केला आहे. 17 कोटींचा पॅलेस आणि खासगी विमानांच्या बातम्या चुकीच्या असल्याचे त्यांनी सांगितले. उदयपूरमध्ये लग्न होणार होते आणि एकूण खर्च अंदाजे 4 ते 5 कोटी रुपये असणार होता, असा दावा त्यांनी केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 27, 2026 | 03:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 17 कोटींचा पॅलेस आणि प्रायव्हेट जेटच्या चर्चांना सियाच्या वडिलांचा नकार.
  • लग्न उदयपूरमधील रिसॉर्टमध्ये होणार असल्याचे सांगितले.
  • लग्नाचा एकूण खर्च 4 ते 5 कोटींच्या आसपास असल्याचा दावा.
पुणे: महाराष्ट्रातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक दावे आणि चर्चा समोर येत आहेत. केतन आणि सिया गोयल यांच्या होणाऱ्या लग्नासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, 17 कोटींचा पॅलेस आणि खासगी विमानांच्या बुकिंगच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र, आता सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी या सर्व दाव्यांवर स्पष्टीकरण देत वेगळेच वास्तव सांगितले आहे.

काय म्हणाले सियाचे वडील ?

सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी सांगितले की, ‘मीडियात चाललेल्या १४ ते १७ कोटी रुपयांच्या विमानांच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि चुकीच्या आहेत. लग्नासाठी कोणतेही खाजगी विमान (Private Jet) बुक करण्यात आले नव्हते. याबद्दल कधी कोणती चर्चाही झाली नव्हती. आम्ही आपापसात ठरवले होते की, जुलै महिन्यात दोन्ही कुटुंबे आपापली विमानाची तिकिटे स्वतः काढतील. पुण्यावरून आमच्या बाजूने साधारण ७० कपल्स जाणार होते. मी स्वतः पुण्यावरून अहमदाबाद आणि तिथून पुढे कारने हॉटेलपर्यंत जाण्याचे नियोजन पुढच्या महिन्यात करणार होतो. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला

लग्न जयपूरला नाही, तर…

जयपूरमध्ये कोणतेही हॉटेल बुक करण्यात आले नव्हते, तर उदयपूरमधील ‘अनंता रिसॉर्ट’ (Ananta Resort) बुक करण्यात आले होते. तिथे एका कपलचा ३ दिवसांचा खर्च साधारण ८७,००० रुपये होता. आमच्या बाजूने ६० ते ६५ खोल्या आणि मुलीच्या बाजूने १५० ते १५५ खोल्या बुक केल्या होत्या. ३ दिवसांचे बजेट, कार्यक्रम, जेवण या सर्वांचा मिळून हॉटेलचा एकूण खर्च २.७५ कोटी ते ३ कोटी रुपयांच्या दरम्यान होणार होता, असे सियाच्या वडिलांनी म्हंटल. पुढे म्हणाले
मुलगा-मुलगी एकमेकांना भेटल्यानंतर दीड-दोन तास त्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर एका छोट्या कार्यक्रमात लग्न ठरले. १५ ऑगस्टला येणारा सण आणि घरातील माता की चौकीचा कार्यक्रम, तसेच हॉटेलचा सर्व खर्च मिळून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण लग्नाचा एकूण खर्च साधारण ४ ते ५ कोटी रुपयांच्या दरम्यान होणार होता. यापेक्षा मोठा कोणताही खर्च नव्हता.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांबाबत दिली महत्त्वाची माहिती

आम्ही त्यांना काही गोष्टी दिल्या होत्या. त्यांनी देखील सियाला जे काही दिले होते, ते आम्ही तातडीने त्यांच्याकडे सुपूर्द केले होते. आमच्या घरात डिसेंबर महिन्यापासून नूतनीकरणाचे काम सुरू असून तिथे १० लोकांची टीम काम करत आहे. जर आम्ही पती-पत्नी बाहेर गेलो, तर मागे दागिन्यांची देखभाल कोण करणार? याच काळजीपोटी माझी पत्नी नेहमी त्यांना फोन करून सांगायची की, ‘दीदी, केतनकडे आम्ही हे दागिने परत देत आहोत, तुम्ही ते सांभाळा, आम्हाला ते इथे ठेवायचे नाहीत.’ त्यामुळे त्यांनी आजपर्यंत जे काही दिले होते, ते आम्ही त्यांना सुरक्षितपणे परत केले होते. असे देखील त्यांनी सांगितले.

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन आणि सियाचे लग्न कुठे होणार होते?

    Ans: केतन आणि सियाचे लग्न उदयपूरमधील अनंता रिसॉर्टमध्ये होणार होते.

  • Que: सियाच्या वडिलांनी कोणत्या बातम्यांचे खंडन केले?

    Ans: 17 कोटींचा पॅलेस आणि खासगी विमान बुक केल्याच्या बातम्यांचे त्यांनी खंडन केले.

  • Que: लग्नाचा अंदाजे खर्च किती सांगण्यात आला?

    Ans: लग्नाचा एकूण खर्च साधारण 4 ते 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Ketan agrawal case siyas father clarifies reports about a 17 crore palace and chartered planes reveals the actual wedding budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • crime
  • Ketan Agarwal
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.