Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Raid : भेसळीचा संशय; बीडमधील मिठाई उत्पादन केंद्रावर FDA ची कारवाई, गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील दहिवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने मिठाई उत्पादन केंद्रावर छापा टाकून अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात येणारे मिल्क केक, बर्फी आणि इतर अन्नपदार्थांचा ३५,५३६ रुपयांचा साठा जप्त करून नष्ट केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2026 | 06:07 PM
भेसळीचा संशय; बीडमधील मिठाई उत्पादन केंद्रावर FDA ची कारवाई, गुन्हा दाखल

भेसळीचा संशय; बीडमधील मिठाई उत्पादन केंद्रावर FDA ची कारवाई, गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • भेसळीचा संशय
  • बीडमधील मिठाई उत्पादन केंद्रावर FDA ची कारवाई
  • बर्फीसह विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील दहिवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मिठाई उत्पादन करणाऱ्या आस्थापनेवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक वातावरणात मिल्क केक, बर्फीसह विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी ३५ हजार ५३६ रुपयांचा अन्नसाठा जप्त करून घटनास्थळीच नष्ट केला. तसेच भेसळीसाठी वापरला जाणारा संशयित पदार्थ आढळल्याने संबंधित व्यावसायिकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या बीड कार्यालयाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २ जुलै २०२६ रोजी मौजे दहिवंडी येथील मे. जय श्री कृष्णा केक बर्फी या आस्थापनेवर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान विक्रेता अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे नियम न पाळता अत्यंत अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात बर्फी आणि मिल्क केकचे उत्पादन करत असल्याचे निदर्शनास आले.

संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

यावेळी अधिकाऱ्यांनी उत्पादनासाठी वापरण्यात येणारे आणि साठवून ठेवलेले विविध अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले. यामध्ये मिल्क केक, ब्राऊन बर्फी, खोवा, रवा, रिफाइंड पामोलीन तेल, मोतीचूर दाणा तसेच ‘सेफोलाइट’ (Safolite) हा खाद्यपदार्थ नसलेला संशयित भेसळकारी पदार्थ आढळून आला. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

तपासणीदरम्यान आस्थापनातील उत्पादन आणि साठवणूक प्रक्रिया अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळल्याने सुमारे ३५ हजार ५३६ रुपयांचा तयार अन्नसाठा कमी दर्जाचा, असुरक्षित व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला. हा साठा नाशवंत असल्याने आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी घटनास्थळी खोल खड्डा करून संपूर्ण अन्नसाठा नष्ट केला.

कारवाईदरम्यान ‘सेफोलाइट’ हा खाद्यपदार्थ नसलेला पदार्थ आढळल्यामुळे कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित (वय २२) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ चे कलम ५७ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७४ आणि २७५ अन्वये शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्रत्यक्षात भेसळ किंवा निकृष्ट दर्जा असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर आणखी कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा आस्थापनांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

Web Title: Beed fda raid milk cake burfi unit adulteration case shirur kasar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Beed
  • crime
  • FDA

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
4

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.