Walmik karad: बीड कारागृह मारहाण प्रकरणी तुरुंग प्रशासनाचा मोठा निर्णय; महादेव गित्ते अन् चार आरोपींना थेट...
बीड: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये आणि खंडणीच्या आरोपाखाली असलेल्या वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता बीड जिल्हा कारागृहात बबन गित्ते समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैद्यांमध्ये मारामारी झाली. दरम्यान या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
वाल्मीक कराड आणि सुदर्श घुलेला मरण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यांना बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्तेने मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. मात्र तुरुंग प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यांनंतर महादेव गित्ते आणि चार आरोपींची रवानगी बीड कारागृहातून दुसरीकडे करण्यात आली आहे.
महादेव गित्ते आणि चार आरोपी यांना बीड कारागृहतून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. यां सर्वांना बीड जिल्हा कारागृहतून छत्रपती संभाजीनगरची हर्सूल कारागृहात पाठवण्यात आले आहे. या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. मारहाण प्रकरणानंतर तुरुंग प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
बबन गिते हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होता. मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. बापू आंधळे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते आणि सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी बबन गिते यांच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या नऊ महिन्यांपासून बबन गिते फरार आहेत आणि अद्याप पोलिसांना त्यांच्या ठावठिकाण्याचा शोध लागलेला नाही.
Beed Crime: बीडचा आका वाल्मिक कराडला तुरूंगात मारहाण करणारा महादेव गिते कोण?
आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, परळी पोलिसांच्या तपासात वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे त्यांचे नाव आरोपींच्या यादीतून वगळण्यात आले.
तुरुंग प्रशासनाने फेटाळला दावा
बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. सुरुवातीला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, बीड तुरुंग प्रशासनाने हे वृत्त फेटाळले आहे. प्रशासनाच्या मते, तुरुंगातील टेलिफोन वापरण्यावरून दोन कैद्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता, परंतु या वादात ना वाल्मिक कराडचा सहभाग होता, ना सुदर्शन घुलेचा. घटनेच्या वेळी हे दोघे घटनास्थळी नव्हते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, तुरुंगात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासन जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते. तसेच, काही कैद्यांना तत्काळ दुसऱ्या तुरुंगात हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.