
Karnataka Crime : 'तू जास्त पीस का खाल्ले?' चिकनवरून वाद अन् मित्रानेच पोटात खुपसला सुरा
धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत: च्या मुलाला…
रागाच्या भरात नको ते घडलं…
मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम आणि अरुण दोघेही त्या दिवशी पार्टी करत होते. याचवेळी दोघांंमध्ये चिकनच्या एका पीसवरुन वाद सुरु झाला. गोष्ट इतकीच होती की, एकाने दुसऱ्याहून जास्त चिकनचे पीस खाल्ले. यावरुन दोघांमध्ये सुरुवातील किरकोळ वाद सुरु झाला आणि नंतर याच वादाचे हत्येत रुपांतर झाले. चिकनच्या पीसवरुन सुरु झालेला हा वाद पुढे इतका भीषण बनला की अरुण कुमारने मित्र सीतारामवर चाकूने हल्ला केला. बाजूला असलेली सुरी त्याने सीतारामच्या पोटात खुपसली. सीताराम जमिनीवर कोसळला, त्याचे शरीर रक्ताने माखले होते.
गुन्हा लपविण्याचा केला होता प्रयत्न
मित्राला मारल्यानंतर अरुण कुमार घाबरला आणि त्याने हा एक अपघात आहे असं भासवण्यासाठी एक खोटी कहाणी बनवली. जखमी सीतारामला घेऊन तो गोकाक येथील सरकारी रुग्णालयात गेला. रुग्णालयात मित्राला दाखल केल्यानंतर अरुणने मित्राच्या अपघाताची खोटी कथा सांगितली. त्याने डाॅक्टर आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सीताराम बिल्डिंगवरुन खाली पडल्याचा दावा केला.
Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण
पोलिसांनी लावला छडा
अरुणच्या खोट्या दाव्यावर डाॅक्टर आणि पोलिसांना लगेच संशय आला. रुग्णालयात पोहचलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आणि आरोपी अरुणला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी सक्तीने चाैकशी केल्यानंतर अरुणने आपला गुन्हा कबूल केला आणि मित्राची हत्या त्यानेच केल्याची कबूली दिली. चाकूने केलेला वार इतका खोल होता की, उपचारादरम्यान सीतारामचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी अरुणवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.