Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावळं होणं ठरलं कारण! आईने प्रियकरासोबत मिळून 6 वर्षांच्या मुलीची केली हत्या, 3 महिन्यांनंतर पापाचा झाला खुलासा

Bengaluru Crime : बंगळूरुतून ६ वर्षांच्या मुलीच्या हत्येचे धक्कादायक कारण समोर येत आहे. या प्रकरणी आई आणि तिच्या प्रियकरावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार मुलीच्या वडिलांनी दाखल केली असून त्यांनी मृत्यूचे कारण पोलिसांसमोर स्पष्ट केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2026 | 10:28 AM
सावळं होणं ठरलं कारण... आईने प्रियकरासोबत मिळून स्वत:च्याच मुलीची केली हत्या, 3 महिन्यांनंतर पापाचा झाला खुलासा

सावळं होणं ठरलं कारण... आईने प्रियकरासोबत मिळून स्वत:च्याच मुलीची केली हत्या, 3 महिन्यांनंतर पापाचा झाला खुलासा

Follow Us
Follow Us:
  • मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मांडलेल्या शंकांमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
  • काही महिन्यांनंतर समोर आलेल्या वैद्यकीय अहवालाने तपास यंत्रणांचे लक्ष वेधले.
  • पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई सुरू केली असून तपास अद्याप सुरू आहे.
आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बंगळूरुमध्ये घडली आहे. इथे आईनेच प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या मुलीचा खून केला आणि नंतर त्याला नैसर्गिक मृत्यू झाला आहे असे भासवले. या घटनेत खरा ट्विस्ट तीन महिन्यांनंतर जेव्हा आईचा हा कांड उघडकीस आला. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच आईने केलेल्या क्रुर कृत्याची माहिती पोलिसांना लागली आणि त्यांनी तातडीने महिलेच्या प्रियकराला अटक केली. मुख्य आरोपी आई अद्याप फरार आहे.

Satara Crime: कराडमध्ये अभियंत्याचा ‘अपघात’ नव्हे तर कट! पत्नी आणि मेहुण्यानेच रचला घातपात; CCTV समोर

नवऱ्याने पत्नीवर लावले आरोप

आरोपी महिलेचे पती प्रवीण यांनी सांगितले की, त्यांची मुलगी वेनिला हिचा २४ मार्च रोजी संशायास्पद मृत्यू झाला. २००७ साली त्याचा विवाह प्रियंका नावाच्या महिलेसोबत झाला. १९ वर्षांच्या या वैवाहिक जीवनात त्यांना दोन मुली झाल्या. पहिल्या मुलीचे वय १७ वर्ष आहे तर मृत मुलगी वेनिला ही फक्त ६ वर्षांची होती. पतीने आरोप केले की, आरोपी प्रियंका हिचे मागच्या काही वर्षांपासून तिचा काॅलेजचा मित्र मोहनसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. जेव्हा प्रवीणला या प्रेमसंबंधाविषयी माहिती झाली तेव्हा त्याने याचा विरोध करायला सुरुवात केली. नवऱ्याला समजल्यानंतरही प्रियंकाने मोहनसोबतचे आपले नाते थांबवले नाही तर तिने पती प्रवीणकडून घटस्फोटाची मागणी केली. काही दिवसांनी ती ६ वर्षांच्या वेनिलाला घेऊन प्रियकरासोबत राहण्यासाठी कडुगोडी गेली. यानंतर पतीला वेनिलाच्या मृत्यूची बातमी मिळाली.

पतीने पोलिसात दाखल केली तक्रार

प्रवीणने पोलिसांना सांगितले की, मुलीच्या अचानक मृत्यूने तो हादरला. त्याने जेव्हा पत्नी प्रियंकाला मृत्यूचे कारण विचारले तेव्हा ती वेगवेगळी कारणे सांगू लागली ज्यामुळे तिच्यावर संशय वाढू लागला. यानंतर काही दिवसांनी प्रवीणच्या हातात वेनिलाचे पोस्टमार्टम रिपोर्ट हाती लागले. रिपोर्ट हाती येताच त्याने इंग्लंडमध्ये राहणाऱ्या आपल्या डाॅक्टर बहिण पाैर्णिमा हिला ते रिपोर्ट्स पाठवले. पाैर्णिमाने प्रवीणला सांगितले की, हा मृत्यू अनैसर्गिक आहे. अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की मुलीवर हल्ला झाला होता आणि गुदमरून तिचा मृत्यू झाला होता. हे कळल्यावर प्रवीण पूर्णपणे खचून गेला आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली.

UP Crime : ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट, बुरखा घालत फुल-प्रुफ प्लॅनिंगने केला मित्राचा खून

मुलीचा सावळा रंग ठरले कारण

हत्येचे काय करुन असू शकते यावर प्रवीणने सांगितले की, आरोपी प्रियंका आणि तिचा प्रियकर मोहन याला मुलीचा सावळा रंग आवडत नव्हता. पती प्रवीणने सांगितले की, प्रियंका मुलीच्या सावळ्या रंगामुळे नेहमीच रागात असायची. त्याने आरोप केला की, वेनिलाच्या सावळ्या रंगामुळेच प्रियंका आणि मोहनने तिचा खून केला. मुलीच्या पोटात लाथ मारुन आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोपही प्रवीणने लावला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी प्रेमी मोहनला अटक केली असून मुख्य आरोपी प्रियंका अद्याप फरार आहे. पोलिस फाॅरेंसिक रोपोर्टची प्रतीक्षा करत असून या रिपोर्ट्सच्या आधारावरच मुलीच्या मृत्यूच्या खरे कारण उघड होईल.

 

Web Title: Bengaluru crime mothers affair leads to shocking twist in six year old girls death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Bengaluru
  • crime news
  • Girl Murder

संबंधित बातम्या

विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; आठवडाभरात तब्बल 116 आरोपी अटकेत
1

विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; आठवडाभरात तब्बल 116 आरोपी अटकेत

पाटस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 10 आरोपींना अटक; माजी सरपंचांचे ट्रान्सपोर्ट ऑफिस वादाच्या केंद्रस्थानी!
2

पाटस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 10 आरोपींना अटक; माजी सरपंचांचे ट्रान्सपोर्ट ऑफिस वादाच्या केंद्रस्थानी!

Accident Breaking: नियतीचा क्रूर खेळ! अस्थी विसर्जनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 9 ठार तर…
3

Accident Breaking: नियतीचा क्रूर खेळ! अस्थी विसर्जनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 9 ठार तर…

UP Crime : ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट, बुरखा घालत फुल-प्रुफ प्लॅनिंगने केला मित्राचा खून
4

UP Crime : ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्येचा कट, बुरखा घालत फुल-प्रुफ प्लॅनिंगने केला मित्राचा खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.