
crime (फोटो सौजन्य: social media)
भंडारा: भंडारा जिल्ह्यातून लाखोंची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आरोग्या विभागातील आरोग्य सेवक या रिक्त पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांमध्ये भंडाऱ्याचा तरुण आहे तर एक पुण्याच्या आहे. नेमकं काय आहे प्रकरण?
धक्कादायक ! कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्या आई-वडिलांची निर्घृण हत्या; नंतर स्वत:ही घेतला गळफास
नेमकं प्रकरण काय?
भंडारा जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता भंडाऱ्याचे विजय यावलकर आणि त्यांच्यासह असलेल्या रॅकेटमधील अन्य यांनी प्रती उमेदवार १५ लाख रुपये घेतले. अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील तरुणांकडून ही रक्कम घेतल्यानंतर त्याला आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आल्याचे बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आले. मात्र, तो तरुण जेव्हा भंडाऱ्यात नोकरीवर रुजू होण्यास आला तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आलं. त्याने त्वरित अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यात या रॅकेट विरोधात तक्रार दाखल केली.
दोघांना अटक
या तक्रारीच्या आधारे दर्यापूर पोलिसांचं एक पथक यांच्या मागावर होत. दर्यापूर पोलिसांनी सापळा रचून या पथकाने विजय यावलकर यांच्याशी संपर्क साधून त्याला शिताफीने पुण्याच्या अन्य एका आरोपीसह भंडाऱ्यातून अटक केली आहे. या कारवाईमुले भंडारा जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
फिल्मी स्टाईल हत्येने भंडारा हादरलं! दारूच्या नशेत पैशांचा वाद, तळ्यात बुडवून घेतला जीव
भंडारा जिल्ह्यातून एक फिल्मी स्टाईल हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली (बु) गावातील शेतशिवारात पैशांच्या वादातून एकाने दुसऱ्याला तळ्यात बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत विरली (बु) येथील नरेश दुनेदार (४५) याचा मृत्यू झाला आहे. तर याप्रकरणात नारायण मेश्राम (४२) या आरोपीला लाखांदूर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
काय घडलं नेमकं?
मृतक नरेश आणि आरोपी नारायण हे दोघेही दुपारच्या सुमारास दारूच्या नशेत स्थानिक तळ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान आरोपी मेश्राम याने नरेशवर पैश्यांची चोरी केल्याचा आरोप केला. या आरोपावरून दोघांमध्ये जोरदार वाद आणि मारहाण झाली. या भांडणात संतापलेल्या नारायण मेश्रामणे नरेशला तळ्यात ओढत नेऊन पाण्यात बुडवून ठार केले.
दरम्यान घटनास्थळावरून उपस्थित काही नागरिकांनी हे बघितलं आणि लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पवनी शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी लाखांदूरचे ठाणेदार यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. आरोपीला ताब्यात घेऊन हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखांदूर पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Pune Land Scam Sheetal Tejawani: 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी परदेशात फरार? पोलिसांकडून शोध सुरू
Ans: भंडारा
Ans: दोन
Ans: आरोग्य