
हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
प्रेमेंद्र सिंह पिता भेरू सिंह (वय ३१, रा. खुडाला फालना, जि. पाली, राजस्थान) आणि दिनेश कुमार मगराम चौधरी (वय २८, मूळ रा. खुडाला फालना, जि. पाली, राजस्थान; सध्या रा. फडके हौद चौक, रविवार पेठ, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला ८ ऑक्टोबर रोजी विनोदे कॉर्नर परिसरात एक तरुण एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयिताच्या हालचालींवर नजर ठेवली. प्रेमेंद्र सिंह हा मोटारीतून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये १२ लाख ४५ हजार रुपये किमतीचा एमडी साठा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करून आरोपीची चौकशी सुरू केली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, वसंतराव तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, सोमनाथ पांचाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
हे सुद्धा वाचा : किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ
Ans: पोलिसांनी २४९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत.
Ans: एमडी ड्रग्ज, मोटार आणि दोन मोबाईल असा एकूण १३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Ans: या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यातील रविवार पेठेपर्यंत पोहोचले असून, पोलिसांनी आणखी एका साथीदाराला अटक केली आहे.