Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

वाघोली येथील वढू गावात किरकोळ वादातून अल्पवयीनांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ३ अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 17, 2026 | 02:16 PM
किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाचा खून.
  • पाच दिवसांपूर्वीच्या वादातून तीक्ष्ण शस्त्राने हल्ला.
  • लोणीकंद पोलिसांनी तीन अल्पवयीना घेतले ताब्यात.
पुणे : वाघोली येथील वढू गावात किरकोळ वादातून अल्पवयीनांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ३ अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१, रा. दत्तनगर, कोरेगाव भीमा, ता. शिरुर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विकासकुमार याचा मोठा भाऊ आकाशकुमार (वय २३) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी तीन अल्पवीयानांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवास्तव मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. विकासकुमार याचा पाच दिवसांपूर्वी अल्पवयीनांशी वाद झाला होता. वादातून १४ ऑक्टोबर रोजी अल्पवयीनांनी त्याच्यावर शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना लोणीकंद परिसरातील वढू खुर्द गावात असलेल्या आमदारनगर परिसरात घडली. अर्धवट बांधकाम झालेल्या एका इमारतीच्या परिसरात मृतदेह सापडल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी तपास सुरू केला. तरुणावर शस्त्राने वार केल्याचे उघडकीस आले. खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपायुक्तांची घटनास्थळी भेट

पोलीस उपायुक्त अबिनाशकुमार, सहायक आयुक्त अनिता मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. खून प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश देण्यात आले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून अल्पवयीनांनी विकासकुमार याचा खून केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

भारती विद्यापीठ परिसरात खुनाचा प्रयत्न

किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. याबाबत एका अल्पवयीनाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी प्रेम लखन वाळवकर (वय १९, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, आंबेगाव) असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन आणि त्याचा मित्र हे रात्री दहाच्या सुमारास भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागानगर परिसरातून निघाले होते. मित्रावर वार करुन आरोपी पसार झाले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: खून झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: तरुणाची हत्या कुठे आणि कधी झाली?

    Ans: १४ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील वढू खुर्द गावातील आमदारनगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: लोणीकंद पोलिसांनी खुनाच्या प्रकरणात तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: A shocking incident involving the murder of a young man has taken place in wagholi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
1

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
3

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.