Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

नांदेड-हिंगोली महामार्गावरील अर्धापूर येथील शेतशिवारात २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याची धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ११ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 17, 2026 | 12:17 PM
अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Follow Us
Follow Us:
  • अर्धापूर शेतशिवारात २५ वर्षीय अनिल किर्तने यांची हत्या.
  • डोक्यावर, गळ्यावर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार.
  • वडिलांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल.
नांदेड : एक मोठी बातमी समोर आली आहे. नांदेड-हिंगोली महामार्गावरील अर्धापूर येथील शेतशिवारात २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याची धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ११ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. अनिल गौतम किर्तने (वय २५, रा. असोला, ता. वसमत; सध्या रा. कवठा रोड, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे अर्धापूर परिसरासह नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपूर्वी अज्ञात कारणावरून आरोपीने अनिल किर्तने याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीने अनिलच्या डोक्यावर, गळ्यावर आणि छातीवर वार केले. गंभीर जखमा झाल्यामुळे अनिलचा मृत्यू झाला. भरदिवसा तरुणाची अशा प्रकारे हत्या झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मृत अनिलचे वडील गौतम शंकर किर्तने (वय ५२) यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे सुद्धा वाचा : खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

तरुण शेतकऱ्याच्या हत्येमुळे किर्तने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिलच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या हत्येमागे कोणते कारण होते, आरोपीने हा हल्ला का केला आणि घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याबाबत अधिक माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. अर्धापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेतील आरोपीची ओळख, हत्येमागील हेतू आणि इतर तपशीलांबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: अनिल गौतम किर्तने (वय २५, रा. वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: हत्या कुठे आणि कधी झाली?

    Ans: नांदेड-हिंगोली महामार्गावरील अर्धापूर येथील शेतशिवारात ११ ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident involving the murder of a farmer has taken place in nanded district nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • nanded news

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
2

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.