सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
पडघा पोलीस ठाण्यात नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात सामूहिक लैंगिक अत्याचारासह शस्त्र कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपांनुसार बापगाव येथील फार्महाऊसवर ही घटना घडली. पवार यांनी आरोप फेटाळले असून ते खोटे असल्याचा दावा केला आहे. आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.
Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
पडघा पोलिसांनी अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला विरोध केला आणि सांगितले की, प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी आणि हस्तगत करण्यासाठी आरोपींची अटक आवश्यक आहे. पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली की, फार्महाऊसवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर गहाळ असून तो परत मिळवणे आवश्यक आहे. या घटनेत कथितरित्या वापरलेली कारही जप्त करणे आवश्यक आहे.
पवार यांच्या वकिलांनी न्यायालयात चॅट रेकॉर्ड सादर करून आरोपांचे खंडन केले आणि दावा केला की, त्यांच्या तक्रारदार महिलेसोबत संमतीने संबंध झाले होते. वकिलांनी सांगितले की, महिलेने नंतर काही मागण्या केल्या ज्या पूर्ण झाल्या नाहीत. त्याने असाही दावा केला की, घटनेनंतर ती महिला गणपती दर्शनासाठी भेट देण्यासाठी पवार यांच्या घरी आली होती आणि जेव्हा तिच्या मागण्या पूर्ण न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
बचाव पक्षाने असाही आरोप केला की, त्या महिलेने पवार यांना नंतर फसवण्याचा उद्देशाने व्हिडिओ बनवला होता आणि जर तीला व्हिडिओ बनवण्याचा टाइम भेटला तर त्या टाइम मधे ती मदतीसाठी पोलिसांना किंवा इतर कोणालातरी बोलावू शकली असती. तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले की, फार्महाऊसचे गेट रिमोटने चालवले जात होते आणि त्या महिलेला माहित होते की ती पळून जाऊ शकत नाही. तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेने मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फार्महाऊसवर नेटवर्क नसल्यामुळे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नव्हते.
सामूहिक बलात्काराच्या आरोपांव्यतिरिक्त, पवार आणि पाटील यांच्यावर शस्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी अटकेपासून अंतरिम संरक्षणासह अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. बुधवारी, न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आणि तपास अधिकारी व तक्रारदार यांना त्यांचे उत्तर मागण्यासाठी नोटीस बजावली.
जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात






