Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangamner Crime News: दत्तधाम आश्रमातील धक्कादायक वास्तव समोर! राजेंद्र गडगेचे २०० हून अधिक व्हिडिओ जप्त

अंधश्रद्धा पसरवून 'पुत्रप्राप्ती' करून देण्याचे दावे बाबाकडून केले जात होते. संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चाबाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 25, 2026 | 04:10 PM
Bhondu Baba Rajendra Gadge Sangamner, Dattadham Sarkar Ashram Wadgaon Pan,

Bhondu Baba Rajendra Gadge Sangamner, Dattadham Sarkar Ashram Wadgaon Pan,

Follow Us
Close
Follow Us:
  • राजेंद्र गडगे याने गंभीर आजार बरे करण्याचे आणि चमत्कारांचे आमिष दाखवून भक्तांची आर्थिक लूट
  • या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना बाबाचे २०० पेक्षा जास्त व्हिडिओ
  • अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर बाबा आणि त्याच्या एका सहकाऱ्याला अटक
Sangamner Crime News: वडगाव पान (ता. संगमनेर) येथील स्वतःला ‘दत्तधाम सरकार’ म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या काळ्या साम्राज्याचा पोलिसांनी पर्दाफाश करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास आता गंभीर वळणावर असून बाबाचे २०० पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या तपासाबाबत सविस्तर माहिती दिली असून, बाबाच्या मालमत्तेसह त्याच्या तथाकथित उपचारांचीही कसून चौकशी केली जात असल्याची माहिती वाघचौरे यांनी दिली.

वडगाव पान येथील दत्तधाम सरकार आश्रमात्तचे राजेंद्र गडगे याने विविध गोष्ट सांगत भक्तांची लूट केलेली आहे. त्यात गंभीर आजार बरे करतो, मुलगा होईल या शक्ती माझ्याकडे आहे असे सांगून भक्तांकडून आर्थिक लूट केली जात असे. या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र तक्रार दाखल करण्यास कोणी पुढे येत नव्हते. अखेर अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनीच पुढाकार घेत फिर्याद दाखल केली. त्यानंतर गडगेबाबा व त्याच्या एका सहकाऱ्याला अटक केली. येथे औषध पुरविणारा एक डॉक्टर आणि अन्य दोघे अद्याप फरार आहेत. त्याची पहिली पोलिस कोठडी संपल्यानंतर आता त्याला पुन्हा २७तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे.

Gas Connection रद्द होणार? सरकारचा खळबळजनक निर्णय; ‘या’ यादीत तुमचे नाव तर नाही ना?

आतापर्यंतच्या तपासाची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे उपस्थित होते. पोलिसांनी तपासादरम्यान राजेंद्र गडगे याचे २०० पेक्षा जास्त व्हिडिओ जप्त केले आहेत. या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे, भक्तांना कशा प्रकारे भुरळ घातली जात होती किंवा काही आक्षेपार्ह चित्रीकरण आहे का, हे शोधण्यासाठी हे सर्व व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत. या अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘दत्त धाम’ आश्रमातून पोलिसांनी ९० हून अधिक प्रकारची औषधे जप्त केली आहेत. कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय बाबा ही औषधे भक्तांना का आणि कशी देत होता, याची तपासणी सुरू आहे. ही औषधे घातक आहेत का, हे तपासण्यासाठी ती प्रयोगशाळेत पाठवली असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक

बाबाने केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. संगमनेर तालुका आणि परिसरात बाबाने १३ ठिकाणी जमिनी व मालमत्ता खरेदी केल्या आहेत, ज्यांच्याकडून या जमिनी घेतल्या, त्यांची फसवणूक झाली आहे का? याबाबत पोलिस सब-रजिस्ट्रार कार्यालयाकडून माहिती मिळवत आहे. बाबाचे वेगवेगळ्या १० बैंकांमध्ये खाती असून त्यातील व्यवहारांची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे.

Exclusive Series : लिंग समभावाचा वैयक्तिक प्रवास जेव्हा संपूर्ण गावालाच बदलवतो… कोण आहेत ‘दीपक शिंदे’?

 

आणखी एका गुन्ह्याची वर्तविली शक्यता

अंधश्रद्धा पसरवून ‘पुत्रप्राप्ती’ करून देण्याचे दावे बाबाकडून केले जात होते. संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चाबाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी अधिकचा गुन्हा दाखल होऊ शकतो. समाजातील अंधश्रद्धेचा फायदा घेणाऱ्या अशा प्रवृत्ती मुळासकट उखडून टाकण्यासाठी पोलिस पावले उचलत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

भोंदू गडगेचे शिक्षण अवघे दुसरीपर्यंत

कैन्सरसारखे दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा, वेगवेगळ्या आजारांपासून मुक्ती देतो असे सांगून आर्थिक लूट करणाऱ्या गडगे याचे शिक्षण अवघे दुसरीपर्यंत झाले आहे. अपर पोलिस अधीक्षक वाघचौरे यांनी याबाबतची माहिती दिली. या भोंदूला प्रक्रिया या शब्दाचाही व्यवस्थित उच्चार करता येत नसल्याचे ते म्हणाले.

 

Web Title: Bhondu baba exposed in sangamner 200 objectionable videos of dattadham sarkar seized by police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Ahmednagar Crime
  • crime news
  • crime news in marathi

संबंधित बातम्या

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…
1

पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…

“हा बाळाचा नाही, तिच्या निवडीचा प्रश्न”, सुप्रीम कोर्टाने ७ महिन्यांच्या गर्भपाताला दिली परवानगी
2

“हा बाळाचा नाही, तिच्या निवडीचा प्रश्न”, सुप्रीम कोर्टाने ७ महिन्यांच्या गर्भपाताला दिली परवानगी

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त
3

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त

पुणे पोलीस दलात खळबळ, ‘त्या’ दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?
4

पुणे पोलीस दलात खळबळ, ‘त्या’ दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.