Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?

Twisha Sharma Death : लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच मृतावस्थेत सापडलेल्या ट्विशा शर्माच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. सासरच्या लोकांकडून ट्विशाचा मानसिक आणि शारिरीक छळ केला जात होता असा आरोप कुटुंबाने केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 19, 2026 | 09:58 AM
Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?

Suicide Case : मिस पुणे, चित्रपटांमध्ये केलं काम आणि मग न्यायाधिशाच्या मुलासोबत लग्न; कोण होती ट्विशा शर्मा?

Follow Us
Follow Us:
  • मृत्यू प्रकरणानंतर तरुणीच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक दावे समोर आले आहेत.
  • कुटुंबीयांनी मानसिक छळ आणि दबावाचे गंभीर आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चॅट्समुळे प्रकरणाला नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
भोपाळमध्ये झालेल्या ट्विशा शर्माच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. ३३ वर्षांच्या ट्वीशा १२ मे रोजी तिच्या सासरच्या घरी मृतावस्थेत आढळली ज्यानंतर या मृत्यूविषयी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाला आत्महत्येचं प्रकरण मानलं पण ट्विशाच्या आई-वडिलांनी या प्रकरणाला एक वेगळेच वळण दिले. त्यांनी आरोप केला की, तिचा मृत्यू आत्महत्येमुळे नाही तर हुंडा आणि मानसिक छळामुळे झाला. पालकांच्या या गंभीर आरोपानंतर हे प्रकरण आणखी गंभीर झाले असून पोलिसांद्वारे याचा तपास केला जात आहे. या प्रकरणाबाबत ट्विशाचे अनेक चॅट्स देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात ती सासरच्यांकडून तिला होणाऱ्या छळाचे वर्णन करताना दिसली.

माॅडलिंग आणि फल्म इंडस्ट्रीमध्ये केलं होतं काम

ट्विशा शर्मा ही उत्तर प्रदेशातील नोएडा येथील रहिवाशी होती. तिने MBA मध्ये शिक्षण पूर्ण केलं होतं आणि यासोबतच मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रातही ती कार्यरत होती. दिल्लीमध्ये ती बऱ्याच काळापासून नोकरी करत होती. इतकंच नाही तर माॅडलिंग आणि चित्रपट क्षेत्रातही तिने काम केलं होतं. ती मिस पुणे देखील राहिली होती, अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये तिने काम केलं होतं. यासोबतच ती एक योगा ट्रेनर देखील होती.

२०२५ साली, भोपाळचे वकील समर सिंह यांच्यासोबत तिचा विवाह झाला. माहितीनुसार, समर सिंह यांची आई गिरिबाला सिंह या माजी न्यायाधीश होत्या. एक चांगलं प्रभावशाली घराणं आहे असा विचार करत आई-वडिलांनी त्रिशाचं लग्न तर लावून दिलं पण काही महिन्यांतच तिला सासरच्या जाचाला सामोरं जावं लागलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १२ मे च्या रात्री त्रिशाने आपल्या सासरच्या घरात फाशी घेऊन स्वत:च आयुष्य संपवलं. या घटनेनंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं जिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. त्या रात्री ती आपल्या कुटुंबाच्या संपर्कात होती आणि तिने घर सोडून जाण्याचं वक्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे.

कुटुंबाने केलेल्या आरोपांनुसार, लग्नानंतर ट्विशाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. ती गरोदर असताना नवऱ्याने तिच्या चारित्र्यावर प्रश्न देखील केल्याचा आरोप आहे. आईसोबत ट्विशाचे चॅट्स समोर आल्यानंतर या घटनेले नवे वळण मिळाले. यात तिने आपल्यासोबत होणाऱ्या त्रासाचे वर्णन केले. तिने यात म्हटले की, त्या घरात तिला अडकल्यासारखं वाटतं आहे.

सासरच्यांनी ट्विशावर केला आरोप

दुसरीकडे आरोपी पक्षाने या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. सासू, गिरीबाला सिंग यांनी ट्विशाला अमली पदार्थांचे व्यसन असून ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा करत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. याचिकेत असंही म्हटलं गेलंय की, तिच्या वागणूकीत बदल दिसून आला होता आणि कुटुंबालाही याची माहिती होती. तर ट्विशाच्या वडिलांनी आरोप केली आहे की, प्रभावशाली कुटुंब असल्याकारणाने तपास योग्य पद्धतीने होत नाहीये. त्यांनी निष्पक्ष चाैकशी आणि न्यायालयीन देखरेखीची मागणी केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून कुटुंबाने अत्यंसंस्कार पुढे ढकलत दुसऱ्या शवविच्छेदनाची मागणी केली आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, जोपर्यंत निष्पक्ष तपास होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.

 

Web Title: Bhopal twisha sharma death case dowry harassment allegations crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • bhopal
  • crime news
  • Dowry Prevention Act
  • Suicide case

संबंधित बातम्या

Pune Crime : १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी शोधण्याचा करत होता बनाव, संतप्त ग्रामस्थांनी केली फाशीची मागणी
1

Pune Crime : १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी शोधण्याचा करत होता बनाव, संतप्त ग्रामस्थांनी केली फाशीची मागणी

Kupwad Double Murder Case:  कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक
2

Kupwad Double Murder Case: कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोपीचंद पडळकर आक्रमक; सांगली-कुपवाडमध्ये बंदची हाक

Delhi Crime: अवघे पाऊणशे वयोमान! डेटिंग App वरून 67 वर्षाच्या पुरुषाशी केली महिलेे मैत्री, डिनर डेटवर गेली अन्…
3

Delhi Crime: अवघे पाऊणशे वयोमान! डेटिंग App वरून 67 वर्षाच्या पुरुषाशी केली महिलेे मैत्री, डिनर डेटवर गेली अन्…

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात
4

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.