Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय ?

विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातचं आता रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 21, 2024 | 02:01 PM
'धंगेकरांना केलेले घोटाळे वाचवण्यासाठी सत्तेची गरज, त्यांच्यामुळे पक्षाला...'; काँग्रेसच्या 'या' नेत्याची जहरी टीका

'धंगेकरांना केलेले घोटाळे वाचवण्यासाठी सत्तेची गरज, त्यांच्यामुळे पक्षाला...'; काँग्रेसच्या 'या' नेत्याची जहरी टीका

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त साबण, उटण्याचे किट घेऊन जाणारा टेम्पो निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडला. नंतर याची निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून रविवारी रात्री उशिरा रविंद्र धंगेकर तसेच त्यांच्या हिंदमाता प्रतिष्ठान विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निवडणूक आयोगातील अधिकारी स्वामीनंद पोतदार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार, टेम्पो चालक तुषार अशोक अंदे तसेच आमदार रविंद्र धंगेकर गुन्हा नोंदवला आहे.

विधानसभा निवडणूकाची आचारसंहिता गेल्याच आठवड्यात लागू झाली आहे. विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. याकाळात मतदारांना आमिष दाखवल्यानंतर गुन्हा नोंदवला जातो. दरम्यान, कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांचे हिंदमाता प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त मतदारसंघातील नागरिकांना दिवाळीनिमित्त सुगंधी, उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप होत होते. या पिशवीवर धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच एका स्थानिक कार्यकर्त्याचा फोटो छापलेला होता.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला दिवाळी साहित्याचे वाटप होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा पथकाने हा टेम्पो पकडला. तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. भाजप कार्यकर्त्ये देखील टेम्पो पकडताना उपस्थित होते. दरम्यान, भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी नंतर रविवारी रात्री याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानूसार भारतीय न्याय संहिता कलम १७०(१)(आय), १७३, १२३(१)(ए) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. आचारसंहितेत प्रलोभन किंवा वस्तुंचे वाटप करण्यावर बंधन आहे, याची जाणीव आहे उपक्रमात माझा व्यक्तिश: सहभाग नाही. मला अजून उमेदवारी जाहीर झाली नाही. माझा विजय पक्का आहे, त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेल्या पिशव्यांतून नागिरकांना दिवाळी वस्तूंचे वाटप सुरू आहे. माझा मित्र परिवार नागरिकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेल्या पिशव्यांचे वाटप कोण रोखणार, असे यावेळी बोलताना धंगेकर यांनी म्हंटले आहे. माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

Web Title: Big news a case has been registered against mla ravindra dhangekar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 02:01 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
1

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Sangali News : खुलेआमपणे बेदाणा तस्करी; सत्ताधारी मूग गिळून गप्प का? आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
2

Sangali News : खुलेआमपणे बेदाणा तस्करी; सत्ताधारी मूग गिळून गप्प का? आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर
3

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर

गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये ‘प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड
4

गर्भवती करा, १० लाख रुपये कमवा! बिहारमध्ये ‘प्रेग्नंट जॉब सर्व्हिस’च्या नावाखाली मोठा स्कॅम उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.