सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : देशभरासह जगभरातील नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळणार्या सायबर गुन्हेगारांचा नेटवर्क क्रेद्रिय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ने ब्रेक करताना पुण्यातील 10 जणांसह देशातील 26 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सीबीआयने पुण्यासह देशभरात 32 ठिकाणी छापेमारी केली.
सीबीआयच्या माहितीनुसार, नागरिकांना लक्ष करणार्या व संघटीतपणे सुरू असलेल्या सायबर गुन्हेगारीला लक्ष करत सीबीआयने हे छापे टाकले. यामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक राष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. जागतिक स्तरावर काम पाहणार्या सीबीआयच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन पथकाकडून या संदर्भाने माहिती तंत्रज्ञान तसेच विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयकडून 26 सप्टेंबरच्या रात्री उशीरापासून पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि विशाखापट्टणम अशा 32 ठिकाणी छापेमारी सुरू होती. ऑनलाईन सायबर गुन्हेगारी कारवायांमध्ये कॉलसेंटरच्या माध्यमातून 170 जणांना सीबीआयने आतापर्यंत लक्ष केले आहे. पुण्यात रिजंट प्लाझा येथे असलेल्या व्ही. सी. एन्फ्रोमॅट्रीक्स प्रायव्हेट लिमिटेड, मुरलीनगर येथील व्ही. सी. इन्फ्रोमेट्रीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याहस विशाखा पट्टनम, हैदराबाद या ठिकाणावरील कॉलसेंटरवर यामध्ये छापे टाकण्यात आले.
सीबीआयने पुण्यातून दहा, हैदराबाद येथून पाच, विशाखापट्टणम येथून अकरा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून डिजीटल पुरावे आणि महत्वपुर्ण डाटा अशी 951 दस्त ज्यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, आर्थिक माहिती, कम्युनिकेशन रेकार्ड
यांचा समावेश आहे. त्याशिवाय यामध्ये 58.45 लाख रूपयांची रोकड व लॉकरच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या पैकी आरोपी विविध सायबर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होते. त्यामध्ये तांत्रिक साहय्यक म्हणून स्वतःची ओळख करून देणार्यांनी अमेरीकेतील नागरिकांनाही सायबर गंडा घातल्याचे व त्याची ओळख चोरल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींनी नागरिकांना त्यांच्या आर्थिक सुरक्षीतेखाली त्यांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती जाणून घेत त्यांची खाती देखील रिकामी केली. हेसायबर गुन्हेगार नागरिकांना आंतराष्ट्रीय भेटकार्ड व क्रिप्टो करन्सी निधी अशी अमिषे दाखवत त्यांच्या बँक खात्यातून रकमा काढून घेत होते.
एचएसआय (युएसए) आणि फॉरेन लॉ इन्फोर्समेंट एजन्सीज यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला ऑपरेशन चक्र 3 असे संबोधण्यात येत आहे. यामुळे सीबीआय इंटरपोल आणि फॉरेन लॉ एजन्सीच्या सातत्याने संपर्कात असून ही सायबर गुन्हेगारांची संघटीत गुन्हेगारी संपविण्याचे उद्दीष्ठ या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.