Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: गर्भवती वहिनीचा जबरदस्तीला विरोध, दीराने गळा आवळून केली हत्या; बिहार येथील घटना

बिहारच्या वैशालीमध्ये दीराने गर्भवती वहिनीची गळा आवळून हत्या केली. जबरदस्तीला विरोध केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. गुन्ह्यानंतर आरोपीने बनाव रचण्याचा प्रयत्न केला असून तो सध्या फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2026 | 02:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दीराने गर्भवती वहिनीची गळा आवळून हत्या
  • जबरदस्तीला विरोध केल्याने गुन्हा घडल्याचा आरोप
  • आरोपी फरार; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका दिराने आपल्याच गर्भवती वहिनीची अत्यंत क्रूरपणे गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. हि घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात मौना विशनपुर गावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या घटनेतील महिलेचे नाव राधा कुमारी असे आहे. तर तिच्या पतीचे नाव दीपक पटेल असे आहे. दीपक सध्या पुणे येथे मजुरीचे काम करतो. त्यामुळे ती आपल्या मुलांसह गावी राहत होती. राधा ही ३ महिन्यांची गर्भवती होती आणि तिला आधीच २ लहान मुले आहेत. घरातील सर्व सदस्य शेतात गव्हाची कापणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरात कोणीही नसल्याचे पाहून शेजारी राहणारा आणि नात्याने दीर लागणारा साहिल पटेल याने घरात प्रवेश केला. राधा कुमारीवर साहिलने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने याला कडाडून विरोध केला. तेव्हा आरोपीने जवळच असलेली दोरी घेतली आणि तिच्या गळ्याला फास लावून तिची हत्या केली. असा आरोप राधाच्या जिजाजी महेश पटेल यांनी केला.

Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल

दुसऱ्यांना फसवण्याचा बनाव पडला फेल

हत्या केल्यानंतर आरोपी साहिलने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतः पोलीस ठाण्यात फोन केला आणि महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सांगितले. तो या हत्येचा गुन्हा राधाच्या सासू-सासऱ्यांवर ढकलायचे होते. जेणेकरून तो स्वतःला या प्रकरणातून वाचवू शकेल. मात्र पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता काही तांत्रिक पुरावे समोर आले. मृत महिला आणि आरोपी साहिल यांच्यामध्ये मोबाईलवर वारंवार आणि दीर्घकाळ संभाषण झाल्याचे रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहे. या पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय साहिलवर अधिक बळावला आहे.

पोलीस तपास सुरु

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो कायदेशीर प्रक्रियेनंतर उत्तरीय तपासणीसाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. आरोपी साहिल पटेल सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा असुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कुटुंबियांकडून कठोर कारवाईची मागणी

राधा कुमारीच्या माहेरचे लोक देखील मुजफ्फरपूर येथून घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी आरोपी साहिलविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.

Pune Crime: भोर तालुक्यात रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोलिसांचा तपास सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: जबरदस्तीच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे हत्या झाल्याचा आरोप आहे.

  • Que: आरोपीने गुन्ह्यानंतर काय केलं?

    Ans: पोलिसांना फोन करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

  • Que: सध्या पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू आहे.

Web Title: Bihar crime pregnant sister in law resists forced advances brother in law strangles her to death incident reported from bihar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार
1

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला
2

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला

Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…
3

Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी
4

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.