Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar News : मुलाच्या शाैचावरुन वाद; लोखंडी राॅडने मारहाण करत महिलेला केले ठार, परिसरात तणावाचे वातावरण

Women Beaten With Iron Rod : बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून मुलाच्या विष्ठेवरुन वाद निर्माण झाला. या वादाचे रुपांतर पुढे इतक्या भीषणतेत झाले की महिलेची लोखंडी सळईने हत्या करण्यात आली.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2026 | 10:47 AM
Bihar News : मुलाच्या शाैचावरुन वाद; लोखंडी राॅडने मारहाण करत महिलेला केले ठार, परिसरात तणावाचे वातावरण

Bihar News : मुलाच्या शाैचावरुन वाद; लोखंडी राॅडने मारहाण करत महिलेला केले ठार, परिसरात तणावाचे वातावरण

Follow Us
Close
Follow Us:
  • क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच हिंसक वळणावर गेला.
  • घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
  • पोलिसांच्या कारवाईदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ज्याने संपूर्ण राज्याला हादरवलं. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या वादाचे पुढे भीषणतेत रुपांतर झालं आणि जमावाने मारहाण करत महिलेचा जीव घेतला. घटना गुरुवारी घडल्याचे सांगण्यात येत असून मुलाच्या शाैचावरुन हा वाद सुरु झाला होता. संतप्त जमावाने महिलेला लोखंडी सळईने मारण्यास सुरुवात केली ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सांगण्यात येत आहे की, घटनेस्थळी पोलिस उशीराने पोहचल्याने स्थानिकांनी त्यांच्यांवरही दगडफेक करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला हाणले.

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक

सदर घटना भोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महारादूर गावात घडल्याची माहिती आहे. मृत महिलेची ओळख गावचे निवासी सुनील चाैहान यांची पत्नी सुमन देवी अशी पटली आहे. स्थानिकांनी घटनेस्थळी पोलिस उशीराने दाखल झाल्याचा आरोप केला. यावेळी रस्त्यावर प्रशासनविरोधात मोठ्या प्रमाणात प्रदर्शने करण्यात आली. लोकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली ज्यात पोलिस ठाण्याच्या काही वाहनांचे नुकसान झाले. यात पोलिसांच्या वाहनाच्या चालक देखील गंभीर जखमी झाला.

या प्रदर्शनाला रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे सांगितले जात आहे ज्यानंतर प्रदर्शनकर्ते पळून निघून गेले. घटनेविषयी सांगण्यात आलंय की, सुनील चाैहान याच्या घरामागेच आरोपी आतिश चौहानचे शेत होते. सकाळी जेव्हा तो आपल्या शेतात गेला तेव्हा तिथे घाण पाहून तो संतापला आणि त्याने सुनील चाैहानच्या कुटुंबातील मुलांवर शेतात शाैच करण्याचा आरोप लावला. हा वाद पुढे इतका वाढला की आरोपीने सुमन देवीच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार केला. हा वार इतका जबरदस्त होता की यात सुमनचा जागीच मृत्यू झाला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जिथे डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Crime News: पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात

घटनेनंतर आरोपी आतिश चौहानला ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. स्थानिकांचा आरोप होता की, घटनेची माहिती दिल्यानंतरही पोलिस वेळेत घटनेस्थळी दाखल झाले नाही ज्यामुळे लोकांनी आक्रोश करत रस्त्यावर घोषणाबाजी करायला सुरुवात केली. दरम्यान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला आपल्या ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी मृतदेहाला गोपालगंजच्या एका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलंय. रिपोर्ट्स आल्यानंतरच पोलिस पुढील कारवाई करतील. सध्या प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Bihar gopalganj woman killed after dispute over child defecation area tension crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: व्यावसायिक गॅस महागला, पण घरगुती LPG बाबत सरकारचा मोठा दिलासा!
1

Maharashtra Breaking News Updates Today: व्यावसायिक गॅस महागला, पण घरगुती LPG बाबत सरकारचा मोठा दिलासा!

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक
2

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक

बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा! महिलांची फसवणूक करून आरोपी काश्मीरला फरार
3

बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा! महिलांची फसवणूक करून आरोपी काश्मीरला फरार

प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ
4

प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.