Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजयुमोच्या अनुप मोरेचे ‘त्या’ गुन्ह्यात नाव का नाही? फिर्यादीच्या प्रश्नावर पोलिसांचे बेजबाबदार उत्तर; म्हणाले… 

तेजस्विनी चंद्रकांत कदम यांनी याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी तेजस्विनी कदम या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2025 | 05:12 PM
भाजयुमोच्या अनुप मोरेचे 'त्या' गुन्ह्यात नाव का नाही? फिर्यादीच्या प्रश्नावर पोलिसांचे बेजबाबदार उत्तर; म्हणाले... 

भाजयुमोच्या अनुप मोरेचे 'त्या' गुन्ह्यात नाव का नाही? फिर्यादीच्या प्रश्नावर पोलिसांचे बेजबाबदार उत्तर; म्हणाले... 

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी चिंचवड/PCMC Crime: भाजपच्या प्रदेश महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे याच्यासह इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस्विनी चंद्रकांत कदम (वय ३६, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी तेजस्विनी कदम या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी प्राधिकरण), अनिता कृष्णा तिपाले, एकविरा शरीफ खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे व जयेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी आशीष गावडे यांना भेटण्यासाठी चिंचवड येथील त्यांच्या घरी गेल्या होत्या. दरम्यान, बंगल्याबाहेर संशयितांनी आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तू येथे का आलीस? तुला मारून टाकू. तू एकटी राहतेस, अनुप मोरेने तुला मारून टाकायला सांगितले आहे. तुला अपघातात गाडीने उडवू, आमचे आमच्या दादावर खूप प्रेम आहे.

पुण्यात दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई; संशयित दहशतवाद्याला बेड्या

तुला बदनाम करून जगणे मुश्किल करू. अनुप मोरे हा आमचा बाप आहे, तो आम्हाला सांभाळून घेईल, असे म्हणत धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी कदम पुन्हा बंगल्यात परत गेल्या. त्यावेळी श्री कलाटे कार घेऊन त्यांना सोडायला आले असता, अनेक महिलांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. फिर्यादी तेजस्विनी कदम तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलिस ठाण्यात गेल्या असता, अनिता तिपाले व एकविरा खान यांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. तक्रार नोंदवून पोलिस ठाण्याच्या बाहेर येताच तेजस्विनी यांना पुन्हा शंभर जणांच्या टोळक्याने धमकी दिली. तुला मारून टाकू, असे त्यांनी धमकावले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील तपास करत आहेत.

Pune : निलेश घायवळचा ठावठिकाणा लागला! फरार गॅंगस्टर लंडनमध्ये असल्याची पुष्टी; हाय कमिशनच पुणे पोलिसांना उत्तर

पोलिस म्हणतात.. अनावधानाने राहिले नाव

फिर्यादी तेजस्विनी कदम यांनी फिर्याद देताना जबाबात आठ जणांची नावे नमूद केली. त्यातील सात जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनुप मोरे याचा आरोपींच्या नावामध्ये समावेश का केला नाही, अशी विचारणा फिर्यादी महिलेने केली. त्यानंतर पोलिसांनी अनुप मोरे याच्या नावाचा आरोपींमध्ये समावेश केला. अनावधानाने अनुप मोरे याचे नाव राहून गेले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Bjp yuva morcha state president anup more booked in after assault and death threat complaint by woman official tejaswini kadam crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • crime news
  • PCMC POLICE
  • Police News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जे विश्वासू त्यांनीच एक कोटीचे सोनं केलं लंपास! सहा जणांवर गुन्हा दाखल
1

Ahilyanagar News: जे विश्वासू त्यांनीच एक कोटीचे सोनं केलं लंपास! सहा जणांवर गुन्हा दाखल

बिर्हामणे टोळीतील सराईत गुन्हेगाराला बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
2

बिर्हामणे टोळीतील सराईत गुन्हेगाराला बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Navneet Rana Death Threat: भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; थेट हैद्राबादवरून…
3

Navneet Rana Death Threat: भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; थेट हैद्राबादवरून…

Brazil Police News: रस्त्यांवर मृतदेहांचा खच…; ब्राझीलच्या रिओ दि जानेरोमध्ये नेमकं काय झालं?
4

Brazil Police News: रस्त्यांवर मृतदेहांचा खच…; ब्राझीलच्या रिओ दि जानेरोमध्ये नेमकं काय झालं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.