दौलतगनर येथे तब्बल ५ लाखांची घरफोडी
सातारच्या फलटण तालुक्यातील ठाकूरकी या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह जमिनीमध्ये पृलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर डोक्यात गंभीर जखमा आढळून आले. यामुळे ही हत्या असल्याचं निष्पन्न झाले असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सापडलेला मृतदेह संदीप मनोहर रिते याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
नेमकं प्रकरण काय?
फलटण तालुक्यातील ठाकूरकी परिसरात संदीप मनोहर रिते याचा मृतदेह सापडला आहे. रस्त्यालगत असलेल्या जमिनीत एक मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या गळ्यावर तसेच डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या. ही घटना घातपाताची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्धच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून पुराव्यांचे संकलन करत आहे. या घटनेमुळे ठाकूरकी आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.
नवी मुंबई हादरली! चिमुकल्या मुलांसमोरच पत्नीला संपवलं
नवी मुंबई मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नवी मुंबईमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या बायकोला संपवलं. पत्नी झोपेत असतांना आपल्या मुळासमोरच धारधार शास्त्राने तब्बल १५ वेळा सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये घडली आहे. मृत महिलेचे नाव गौरी शिरसाट (वय ३४) असे आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचा नाव गणेश शिरसाट असं आहे.
धक्कादायक ! 14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; मोबाईल काढून घेतला म्हणून राग आला अन्…