निलेश चव्हाणच्या कोठडीत वाढ (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान याच प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. निलेश चव्हाण हा या प्रकरणात सहआरोपी आहे. आज त्याची कोठडी संपणार होती. त्यामुळे त्याला कोर्टातहजर करण्यात आले होते. दरम्यान आज कोर्टात सुनावणी पार पडली.
कोर्टाने वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाणला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. निलेश चव्हाणवर कस्पते कुटुंबाला धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला 14 जुनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
120 तास टॉर्चर अन् 29 जखमा…, 94 काडतुसे जप्त
पुण्यातील भूकुम गावतील हगवणे कुटुंबाच्या छळापायी आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता तपासाला नवे वळण आले आहे. कोर्टात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे.
दरम्यान, पाचही आरोपीचे मोबाईल फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात आले नव्हेत. त्यामुळे तपासात अडथळे येत होते. याच कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती केली होती. जेणेकरून मोबाईलचा शोध घेणे शक्य होईल. पोलिसांन जर आज हे मोबाईल हाती लागले तर वैष्णवीच्या मृत्यूमागचे अनेक गूढ उकलू शकतात, असे म्हटले जात आहे. तसेच वैष्णवीला 120 तास टॉर्चर करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
कडकडणाऱ्या विजांचा प्रकाश अन् गुन्हेगाराचा शोध..! भारती विद्यापीठ पोलिसांनी लावला ‘त्या’ खूनाचा छडा
तसेच न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग व्ही.पी. खंडारे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान, फिर्यादी पक्षाने उघड केले की शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर ३० जखमांच्या खुणा आढळल्या. राज्य सरकारतर्फे उपस्थित असलेले सहाय्यक सरकारी वकील नितीन अडागळे यांनी न्यायालयाला सांगितले की यापैकी २९ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी झाल्याचे आढळून आले. अहवालानुसार, १५ जखमा ताज्या होत्या आणि तिच्या मृत्यूच्या २४ तास आधी झाल्या होत्या. त्याच वेळी, एक जखम ४ ते ६ दिवस जुनी असल्याचे आढळून आले, तर इतर ११ जखमा ५ ते ७ दिवस जुन्या होत्या. याशिवाय, दोन जखमांचा कालावधी ३ ते ६ दिवसांपूर्वीचा असल्याचे मानले जात आहे.
निलेश चव्हाणचा पिस्तूल परवाना वादाच्या भोवऱ्यात…; राजकीय पॉवर कोणाची मिळाली? रंगली चर्चा
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे चर्चेत आलेला निलेश चव्हाणने पुणे पोलिसांनी पिस्तूल परवाना नाकारल्यानंतर अपिलात जाऊन “पॉवर” वापरून तो परवाना गृहविभागाकडून मिळविल्याचे समोर आले आहे. यामुळे निलेश चव्हाण याला नेमकी पॉवर कोणाची मिळाली, त्याला परवाना देण्यासाठी त्याने कोणीची मदत घेतली असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर त्याला परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.