मध्यप्रदेश : मध्यप्रदेशमधून एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर येत आहे. एक तरुण एका तरुणीला अमानषपणे मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. मध्यप्रदेशच्या रीवा जिल्ह्यामधील ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे.
[read_also content=”तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शेजान खानला अटक, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/actor-shejan-khan-arrested-in-tunisha-sharma-suicide-case-case-registered-for-abetting-suicide-nrps-356581.html”]
सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील हो दोघ तरुण-तरुणी प्रियकर प्रेयसी असून त्याच्यांत झालेल्या वाद झाल्याच दिसत आहे. प्रेयसीने लग्नासाठी हट्ट धरल्यामुळे प्रियकराने तिला मारहाण केली. प्रेयसीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरला. प्रेयसीने लग्न कधी करणार असं विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. मारहाणीनंतर तरुणी बेशुद्ध पडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून प्रचंड चर्चेत आहे.
Trigger Warning-Violence
इस राक्षस को धारा 151 की खानापूर्ति करके छोड़ दिया एमपी के रीवा की पुलिस ने
परिवार अगर खूंखार के खौफ से शिकायत नहीं करवाएगा,तो क्या पुलिस इससे भी खौफनाक अगली वारदात के लिए राक्षस को आजाद छोड़ देगी बताएं क्या ये घटना 151 की है
— Yogita Bhayana योगिता भयाना (@yogitabhayana) December 24, 2022
सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.मात्र हा व्हिडिओ पाहताना अंगावर काटा उभा राहतो. कारण हा एक तरुण त्याच्या प्रेयसीला आधी झापड मारली त्यानंतर तरुणी पुन्हा लग्नासाठी विचारल्यावर त्याच्यातला सैतानच जागा होते आणि तो तीला जमिनीवर आपटून लाथेनेही बेदम मारहाण करतो.
आरोपी प्रियकर फरार
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, ही तरुणी 19 वर्षांची आहे. ही घटना बुधवारी घडल्याची माहिती आहे. आरोपी तरुणाला शांतता भंग केल्याच्या आरोपावरून आधी ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचा गुन्हा फार मोठा नव्हता, त्यामुळे त्याची नंतर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, तरुणीला मारहाण केल्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणावर भादंवि कलम 323 सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुण सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर मिळाल्यानंतर व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल