Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime News: सोलापूर हादरलं! भरदिवसा सत्तर फूट रोडवर तरुणाची निर्घृण हत्या; ३५ वेळा कोयत्याचे वार

आरोपींच्या हातात कोयते, लाकडी काठ्या आणि दगड होते. अचानक झालेल्या हल्ल्याने सुरेश यांनी जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला.

  • By anuradha sagar
Updated On: May 03, 2026 | 05:45 PM
प्रेमाचा त्रिकोण : १७ वर्षीय मुलाची हत्या

प्रेमाचा त्रिकोण : १७ वर्षीय मुलाची हत्या

Follow Us
Follow Us:
  • सोलापूरच्या सत्तर फूट रोड परिसरात   सुरेश श्रीराम यांची हत्या
  • कोयता, लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण
  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये   हत्याकांडाचा धक्कादायक व्हिडिओ
 

Solapur Crime News: सोलापूरच्या सत्तर फूट रोड परिसरात भरदिवसा घडलेल्या निर्घृण हत्याकांडाने शहर हादरले आहे. ३५ वर्षीय सुरेश श्रीराम यांची पाच ते सहा जणांच्या टोळीने कोयते, काठ्या आणि दगडांनी अमानुष मारहाण करत हत्या केली.सुरेश श्रीराम दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अचानक दोन ते तीन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी त्यांची वाट अडवली. गाडी थांबताच पाच ते सहा जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला.

आरोपींच्या हातात कोयते, लाकडी काठ्या आणि दगड होते. अचानक झालेल्या हल्ल्याने सुरेश यांनी जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांना चारही बाजूंनी घेरले. भरदिवसा सर्वांसमोर टोळीने सुरेश यांच्यावर तब्बल ३५ वार केल्याचे समोर आले आहे. कोयत्याचे सपासप वार, काठ्यांनी मारहाण आणि त्यानंतर डोक्यावर मोठे दगड घालून आरोपींनी त्यांचा चेहरा विद्रूप केला. या भीषण हल्ल्यानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. हा थरकाप उडवणारा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Amit Thackeray: “आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार का?” नसरापूरमधील घटनेवर अमित ठाकरेंचा सत्तेतील नेत्यांना संतप्त सवाल

एका तासात पाच जणांना अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय कबाडे आणि जेलरोड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या हत्याकांडाचा धक्कादायक व्हिडिओ हाती लागला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत गुन्हा घडल्यानंतर अवघ्या एका तासात पाच आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणातील सहाव्या आरोपीचा शोध सुरू असून त्याला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या वादातून झालेला पूर्वनियोजित हल्ला असल्याचे समोर आले आहे.

Nasarapur Crime News: चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी विरोधक आक्रमक; गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

हा जुन्या वादातून झालेला पूर्वनियोजित हल्ला आहे. आम्ही पाच जणांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधारासह सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.

-विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर

 

Web Title: Brutal day light murder in solapur 35 year old man hacked to death on 70 feet road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Murder Case
  • Solapur Crime
  • Solapur Police

संबंधित बातम्या

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले
1

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
2

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
3

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…
4

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.