Nasarapur Crime News: चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी विरोधक आक्रमक; गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
Nasarapur Crime News: पुणे-नसरापूर येथे झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. हे प्रकरण विशेष जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होईल, यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणे यापेक्षा वाईट काही असू शकत नाही. विरोधकांना काय करायचे ते करू देत पण राज्य सरकार या प्रकरणात जे शक्य आहे ते करणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे जिल्ह्यातील ही घटना अतिशय निंदनीय आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ दिसून येत आहेत. या घटनेतून समाजात रोष आहे. सगळ्यांना त्या मुलीबद्दल, तिच्या कुटुंबियांप्रती हळहळ वाटत आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवू. त्यासाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाला करण्यात येईल. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती देखील करण्यात येईल, असे ते म्हणाले.
Nasrapur Crime News: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची गुन्ह्याची कबुली
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या घटनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यानी या कृत्याचा निषेध करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले, चार वर्षांच्या बालिकेवर असा अमानवी प्रकार घडतो, यापेक्षा दुर्दैवी काही असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी गृहमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर टीका केली. राज्यातील नागरिक असुरक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
८८ पुणे जिल्हयातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारा आहे. है गृहविभागाचे अपयश असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत, त्याचाच हा प्रकार असून आतातरी देवेंद्र फडणवीस यांनी जनाची नाही तर मनाची बाळगून प्रायश्चित म्हणून तरी गृह मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.
– हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Nasrapur crime News: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; राज्य महिला आणि बाल हक्क आयोगाकडून दखल
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आली असून, या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी.
रोहित पवार, आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घटना मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी, असल्याचे म्हटले, तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. याशिवाय त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत या प्रकरणाचा जलद तपास करून खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली.






