शिरपूर तालुक्यातील धक्कादायक घटना (फोटो सौजन्य - RNO/iStock)
धुळेः शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथील चार युवक काळापाणी गावांत आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळ पाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्यामुळे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मैत्रिणीला भेटला असताना…
उमर्दा गावातील वीस वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना संशयाला व त्यांनी या चारही तरुणांना एका घरात डांबून ठेवले. व या चारहीत तरुणांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर उमर्दा गावातील ग्रामस्थांना यासंदर्भात माहिती दिली.
आपल्या मुलांना येथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयेची मागणी काळपाणी गावातील नागरिकांनी केली. यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी तीन तरुणांची सुटका करून घेतली आणि कमलसिंग पावरा याच्या संदर्भात विचारले असता काळपाणी गावातील नागरिकांनी तो रात्रीच येथून पळून गेल्याचे सांगितले.
इंदापूरातील अफूच्या शेतीवर पोलिसांचा छापा, 3 जणांना घेतले ताब्यात; तब्बल 27 लाखांची झाडे जप्त
नाल्यात आढळला मृतदेह
या घटनेनंतर उमर्दा गावातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा शोध घेतला असता तो या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान नातेवाईकांनी त्याची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही मारून टाकल्यानंतर त्याला या नाल्यात फेकून दिलाचा संशय व्यक्त केला.
शिरपूर पोलिसांनी केली पाहणी
यानंतर घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेत कमल सिंग पावरा याचा मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवला. कमल सिंग पावरा याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर उमर्दा गावातील संतप्त नातेवाईकांनी कमल सिंग पावरा याचा मृतदेह थेट कळपाने गावात त्याला मारहाण करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या घरासमोर अंत्यविधी करत संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपींची घराची तोडफोड करत नुकसान केले आहे.
या संपूर्ण प्रकरणी चांगली पोलीस ठाण्यात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला व पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरत सात आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेत इतर आरोपींचा शोध सुरू केला असल्याचे जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक प्रतिनिधींना सांगितले आहे.
पुरंदर तालुक्यात जादूटोण्याचा प्रकार? लिंबू, मडकी, मिरच्या अन् नारळ झाडाला बांधून टांगले