crime (फोटो सौजन्य : social media)
पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बिल्डरने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव लिहून त्यांना मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं आहे. या घटनेने नालासोपारामध्ये एकाच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकेचे नाव जयप्रक्रश चौहान असं आहे. त्याने चिठ्ठीत शाम शिंदे आणि राजेश महाजन या पोलीस कर्मचाऱ्यानेचे नाव लिहून त्यांना मृत्यूसाठी जबादार ठरवलं आहे.
पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास
चार फ्लॅटचा ताबा
मयत जयप्रकाश चौहान यांनी नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथील ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती. त्या बांधकामासाठी पोलीस शिपाई श्याम शिंदे याने त्याच्या नातलगाच्या माध्यमातून ५० लाखांचे फायनान्स केलं होत. एका वर्षात दुप्पट रक्कमेच्या आश्वासनावर त्याने पैसे दिले होते. तसेच जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतला होता.
ती बिल्डिंग आता आमची
इमारत बांधकामास एक वर्षून अधिक वेळ लागला यामुळे त्याने पोलीस शिपाई शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत यांनी मयत जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैशाच्या मागणीचा तगादा लावला आहे. जयप्रकाश यांनी २२ लाख ॲानलाईन आणि 10 लाख रोख रक्कम असे मिळून 32 लाख शाम शिंदेला दिल्याचं नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलं. मात्र तरीही शाम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजनने जयप्रकाश यांना पैश्यासाठी त्रास दिला. ती बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा, अन्यथा खोट्या गुन्ह्यांत अडकवणार अशी धमकी शाम शिंदे याने दिल्याचा दावा चौहान कुटुंबीयांनी केला. शाम शिंदेच्या त्रासाला कंटाळून जयप्रकाश चौहान यांनी अखेर मुलाच्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली. आपण पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.
कारवाई करून न्याय द्यावा
मयत जयप्रकाश चौहान यांच्या मुलीने या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, “आपल्या वडिलांनी ही इमारत उभी करण्याचा प्रयत्न केला. पण 35 लाख रुपये देऊन ही बिल्डिंग घशात घालण्याचा प्रयत्न शाम शिंदे याने केला. ही बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा अशी धमकी शाम शिंदेने दिली. तसेच लाला लजपत याने घरी येऊन आपल्या वडिलांना धमकावले. त्याच्या फोन वरून शाम शिंदेने आपल्या वडिलांना धमकी दिली. त्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केली. शाम शिंदे, राजेश महाजन आणि लाला लजपत यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा.”
धक्कादायक! नवी मुंबईत महिलेला गाडीत बसवून बंदुकीच्या धाकाने लैंगिक संबंधांची मागणी