
crime (फोटो सौजन्य: social media)
बुलढाणा: बुलढाणा येथून एक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे. प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देतो असे म्हणत विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर शिक्षकाला कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे.
Nashik Crime: नाशिकमध्ये हळहळ! घरात एकटी असताना 10 वर्षीय मुलीने घेतला गळफास
काय घडलं नेमकं?
आरोपीचं शिक्षकाचं नाव मुकेश परमसिंग रबडे (वय वर्ष 40 रा. तरोडा तालुका मोताळा) असे आहे. शिक्षकाने तरुणीला मोबाईलवर कॉल करून माझ्याकडे पॉलिचे पुस्तक आहे. नोट्स आहे ते मी तुला देतो व तुझे प्रॅक्टिकल्सचे मार्क्स वाढून देण्यास सांगतो असे सांगून मलकापूर येथील तहसील चौक येथे बोलावले. त्यानंतर गाडीवर बसवून बुलढाणा रोडवरील पंचमुखी जवळील एका खोलीत नेले. त्याठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केले एवढेच नाही तर याचे रेकॉर्डिंगही केले. त्यानंतर तिला तहसील चौक येथे आणून सोडून दिले. याघटनेबाबत कोणालाही सांगू नको नाही तर स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल करेल अशी धमकी सुद्धा त्याने पीडित मुलीला दिली. तिला मारहाण देखील करण्यात आले.
वारंवार फोन आणि धमक्या
यानंतर आरोपी रबडे याने अनेक वेळा त्या तरुणीला फोन केले. मात्र पीडित तरुणीने फोन न उचलल्यामुळे तो धमकी देऊ लागला. याच त्रासाला कंटाळून तरुणीने तिचे वडील भाऊ यांना हा सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि तक्रार नोंदवली. तक्रारीवरून दोदोन आरोपींविरुद्ध पोस्को अंतर्गत मलकापूर शहर पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एका आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बस स्थानकातून गायब झालेल्या ‘त्या’ मुली सापडल्या; २४ तासात पोलिसांनी मुलींना केलं पालकांच्या स्वाधीन
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील तीन अल्पवयीन मुली गायब झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. तिन्ही मुली शेवटच्या या बस स्थानकात दिसल्या होत्या. त्यानंतर त्या कुठेही दिसल्या नाही. या मुलींना शोधण्याचे आवाहन पोलिसांना होते. टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून त्या घराबाहेर पडल्या होत्या. मात्र पोरी काय घरी परतल्या नाही. घाबरलेल्या पालकांनी तात्काळ जळगाव जामोद पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करत अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला. तपासादरम्यान या तिन्ही अल्पवयीन मुली अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आल्या. ही घटना शनिवारी घडली.
Pune Crime: पुण्यात थरारक! चंदननगरात 18 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करत निर्घृण हत्या; ३ जण जखमी
Ans: शिक्षकाने केला अत्याचार
Ans: पॉलिचे नोट्स आहे आणि तुझे प्रॅक्टिकल्सचे मार्क्स वाढून देतो असे म्हणत बोलावले.
Ans: पोलिसांनी पॉक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला