आई वडील कामावर असतांना…
आत्महत्या करणाऱ्या १० वर्षीय मुलीचे आई- वडील हे मोल मजुरीचे काम करतात. दोघे आई वडील हे रोजगारासाठी मोल मजुरी करण्यासाठी गेले होते. यावेळी राहत्या घरात नॉयलॉनच्या दोरीच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास घेत १० वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मुलीचे आई- वडील घरी पोहोचले. तिच्या वडिलांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेने परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे.
मुलीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. नाशिकरोड पोलिसांनी ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत.
कुख्यात लोंढे टोळीचा भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पोलिसांचा सुगावा लागताच ३४ फुटांवर मारली उडी
नाशिकमध्ये मोठी कारवाई करत पोलिसांनी कुख्यात लोंढे टोळीचा सदस्य भूषण प्रकाश लोंढे याला अखेर अटक केली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून तो सातपूरमधील ओरा बार गोळीबार प्रकरणात फरार होता. त्याचा सतत शोध घेऊनही तो पोलिसांना चकवत होता. अखेर उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवर पोलिसांनी राबवलेल्या गुप्त मोहिमेदरम्यान भूषणला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र अटक टाळण्यासाठी भूषणने 34 फुटांवरून उडी मारत पलायन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. गंभीर जखमी अवस्थेतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून वैद्यकीय उपचारानंतर पुढील चौकशी करण्यात येणार आहे.
कोणते गुन्हे दाखल
भूषण लोंढे व त्याच्या टोळीविरुद्ध सातपूर, अंबड, गंगापूर यासह अनेक पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, खंडणी, प्रॉपर्टी हडपणे आणि दहशत निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. संघटित गुन्हेगारीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी लोंढे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. टोळीचा प्रमुख प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत. भूषण मात्र सतत ठिकाण बदलत पळ काढत होता.
Ans: नाशिकच्या सामनगाव येथे राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने.
Ans: नाही, मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Ans: ते दोघे मजुरीसाठी कामावर गेले होते, तेव्हा मुलीने गळफास घेतला.






