Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झेप’ बंगल्याची संरक्षित भिंत पुन्हा बांधली, पोलिस आयुक्तांचा आदेश; चौघांवर गुन्हा दाखल

‘झेप’ बंगल्याची तोडलेली संरक्षित भिंत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर बांधकाम व्यावसायिकाने पुन्हा बांधून दिली आहे. या प्रकरणात चौघांवर गुन्हा नोंदविला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2025 | 01:01 PM
‘झेप’ बंगल्याची संरक्षित भिंत पुन्हा बांधली, पोलिस आयुक्तांचा आदेश; चौघांवर गुन्हा दाखल

‘झेप’ बंगल्याची संरक्षित भिंत पुन्हा बांधली, पोलिस आयुक्तांचा आदेश; चौघांवर गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘झेप’ बंगल्याची संरक्षित भिंत पुन्हा बांधली
  • पोलिस आयुक्तांचा आदेश
  • व्यवसायिकासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : गुलटेकडी परिसरात राहण्यास असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, दिवंगत साहित्यिक ना. स. इनामदार यांच्या ‘झेप’ बंगल्याची तोडलेली संरक्षित भिंत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर बांधकाम व्यावसायिकाने पुन्हा बांधून दिली आहे. या प्रकरणात जबरदस्तीने तसेच पुर्वसूचना न देता भिंत पाडून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

याप्रकरणी इनामदार यांचे जावई सुभाषचंद्र गोपाळराव आरोळे (वय ८०, रा. झेप बंगला, ४२७/ ७८, टिमवी कॉलनी, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक देवेश जैन, जेसीबी चालकासह कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने ३१ ऑक्टोबर रोजी पूर्वसूचना न देता बंगल्याची संरक्षित भिंत पाडून लोखंडी गेट तोडले होते. तसेच बंगल्याचे नुकसान करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता.

यासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. पोलिस आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पुन्हा या सीमाभिंतीचे बांधकाम करुन घेण्यात आले. इनामदार यांच्या मृत्यूपश्चात आरोळे कुटुंब याठिकाणी राहण्यास आहे. बांधकाम व्यावसायिक व आरोळे यांच्यामध्ये खरेदीखत झाले आहे. आरोळे यांनी कागदोपत्री साडेसात कोटी रुपयांना हा बंगला विकला. खरेदीखत झाल्यानंतर ३ महिन्यांत ताबा देण्याचे ठरले. आरोळे यांनी खरेदीखताविषयी आक्षेप घेतले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

हे सुद्धा वाचा : गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती समोर

बंगल्याला कादंबरीचे नाव

साहित्यिक ना. स. इनामदार यांनी पेशवाईतील सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या जीवनावर आधारित ‘झेप’ ही कादंबरी लिहिली. त्यांच्या या पहिल्याच कादंबरीने साहित्य विश्वात अनोखे स्थान निर्माण केले. त्यापाठोपाठ शहेनशाह, मंत्रावेगळा, राऊ अशा त्यांच्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या रसिकांच्या पसंतीस उतरल्या. इनामदार यांचे ६ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले. त्यानंतर, त्यांचे जावई सुभाषचंद्र आरोळे हे त्यांच्या बंगल्यात वास्तव्याला आहेत. पहिल्याच ‘झेप’ कांदबरीने नावलौकिक मिळाल्यामुळे इनामदार यांनी बंगल्याचे नामकरण ‘झेप’ असे केले.

Web Title: Businessman rebuilds demolished wall of zep bungalow in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

टोळ्यांच्या वैरातून पुणे शहर पुन्हा रक्तरंजित! आंदेकर- गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाच्या दुसऱ्या प्रकरणाने खळबळ
1

टोळ्यांच्या वैरातून पुणे शहर पुन्हा रक्तरंजित! आंदेकर- गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाच्या दुसऱ्या प्रकरणाने खळबळ

Ganesh Kale Murder : गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती समोर
2

Ganesh Kale Murder : गणेश काळे खून प्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती समोर

भयमुक्त पुणे की गुन्हेगारांचा अड्डा! दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग; रात्री घरफोड्या अन् लुटमार
3

भयमुक्त पुणे की गुन्हेगारांचा अड्डा! दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग; रात्री घरफोड्या अन् लुटमार

pune crime: एसीबीची मोठी कारवाई! पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील PSI 46.50 लाखांची लाच घेताना अटक
4

pune crime: एसीबीची मोठी कारवाई! पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील PSI 46.50 लाखांची लाच घेताना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.