
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कारचा अपघात; दोघांचा मृत्यू
पिंपरी : जुना पुणे-मुंबई महामार्गावर एका कारचा अपघात झाला. या अपघातात कारचालक जखमी झाला असून, कारमधील दोनसह प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.27) पहाटे चार वाजताच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर मावळ तालुक्यातील वाकसई येथे घडली.
पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ खेडकर यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वाहन चालक अनिकेत गौतम बरवा (मोशी ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत हा या घटनेत जखमी झाला आहे. हुसैन शेख, आसीर इनामदार अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत आणि त्याचे दोन मित्र कार (एमएच 12 एमबी 6541) मधून जुन्या पुणे मुंबई महामार्गाने जात होता.
Pune Accident : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…
मावळ तालुक्यातील वाकसई येथे आल्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारची रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडक बसली. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली. या अपघातात हुसैन शेख, आसीर इनामदार यांचा मृत्यू झाला. तर अनिकेत हा गंभीर जखमी झाला आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३२५.३ येथे स्कॉर्पिओ कारचे टायर फुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एक जण ठार, तर आठ जण किरकोळ जखमी झाले. अमन साहू (वय २५) यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
खराब रस्त्यामुळे चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू
नाशिक गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रस्ते खोदून (Nashik Pothole Deaths) ठेवले आहेत. उन्हाळ्यात रस्त्यांची अपेक्षित डागडूजी किंवा नवीन कामे न करता, महापालिका प्रशासन आणि सरकारने एकाच वेळी सर्व कामे हातात घेतल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नाशिककरांना रस्त्यांवरून चालताना जीवघेणी कसरत करावी लागत असून, गेल्या चार महिन्यांत वेगवेगळ्या अपघातांत खड्यांमुळे तब्बल पाच निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. या दुर्दैवी मृतांमध्ये निलेश कोतकर, प्रभाकर निकम, दिपाली बेळे आणि प्रवीण गायकवाड यांचा समावेश आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारचे टायर फुटल्याने कार उलटून एकाचा मृत्यू