Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: खातेदाराला अंधारात ठेवत ‘FD’ वर काढले पाच लाखांचे कर्ज; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

फिर्यादी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एमआयडीसी चिंचवड शाखेत काही रक्कमेची एफडी केली आहे. ती रक्कम मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या नावावर त्यांच्या परस्पर पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 26, 2025 | 02:35 AM
Crime News: खातेदाराला अंधारात ठेवत ‘FD’ वर काढले पाच लाखांचे कर्ज; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

पिंपरी: खातेदाराच्या परस्पर त्याच्या एफडी रकमेला मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने पाच लाख रुपयांचे कर्ज काढले. ही कर्जाची रक्कम खातेदाराच्या खात्यातून परस्पर इतर खात्यावर ट्रान्सफर करत पाच लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ५ जुलै २०२४ रोजी पूर्णानगर, चिखली येथे घडली. मात्र हा प्रकार एप्रिल २०२५ मध्ये उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पीडित व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एमआयडीसी चिंचवड शाखेत काही रक्कमेची एफडी केली आहे. ती रक्कम मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या नावावर त्यांच्या परस्पर पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले.

ही कर्जाची रक्कम फिर्यादी यांच्या बँक खात्यावर आली असता आरोपीने ती रक्कम इतर खात्यावर ट्रान्सफर करून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली. याबाबत फिर्यादीस काहीही कल्पना नव्हती. एप्रिल २०२५ मध्ये बँकेशी संपर्क केल्यानंतर त्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

गुंतवणुकीच्या बहाण्याने सात कोटींची फसवणूक

एका व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांच्या नावाने व्हाट्स अप मेसेज आणि ईमेल करून पैसे पाठवण्यास भाग पाडले. यामध्ये व्यक्तीची तब्बल सात कोटी १६ लाख ४३ हजार ३६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २४ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात घडली.  या प्रकरणी पीडित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार +49 1636814985, +33 7578121507 हे क्रमांक धारक आणि 9550880238736200481 हा अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyber Crime: आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सात कोटींची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्टीफन ईटर आणि ख्रिस्तोफ बेरगॉट या नावाने स्वतःला सीईओ आणि केपीएमजी कायदे सल्लागार असल्याचे भासवून फिर्यादी यांना व्हाट्स अप मेसेज व ईमेल केले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कंपनीला विदेशात गुंतवणूक करायची असल्याचे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून सात लाख ३८ हजार ५८८ युरो (भारतीय चलनात सात कोटी १६ लाख ४३ हजार ३६ रुपये) पाठवण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.

क्रेडिट कार्ड अपडेट करण्याची बतावणी

क्रेडिट कार्ड अपडेट करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी तरुणाची ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत २७ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिसांत तक्रार दिली आहे. तरुण खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतो. चोरट्यांनी तरुणाला संपर्क साधला. बँकेकडून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची माहिती गोळा केली जात आहे. तसेच, त्यांचे क्रेडिट कार्ड अपडेट केले जात असल्याचे सांगितले. त्यानूसार तरुणाकडून बँक खात्याची गोपनीय माहिती व क्रेडिट कार्डचा पासर्वड मिळवला. तसेच, त्याच्या खात्यातून ३ लाख ८० हजार रुपये स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड तपास करत आहेत.

Web Title: Case filed against unknown person for defrauding account holder and obtaining loan of rs 5 lakhs on his fd pcmc crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • PCMC News
  • PCMC POLICE

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Ashadhi Wari Sohla 2026: पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रोचे अडथळे दूर करण्याचे निर्देश
4

Ashadhi Wari Sohla 2026: पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रोचे अडथळे दूर करण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.