Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ichalkaranji Crime: विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

संपत शिकलगार याची पत्नी राखी हिने २५ फेब्रुवारी रोजी विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारासाठी प्रथम आयजीएम येथे तर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. 

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2025 | 02:35 AM
Ichalkaranji Crime: विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी: सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केलेल्या राखी संपत शिकलगार (रा. वेताळ पेठ) हिच्या मृत्यूस कारणीभूत प्रकरणी तब्बल अडीच महिन्यानंतर मुलासह चौघांवर गावभाग पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे. दीर रतन प्रकाश शिकलगार, भावजय सौ. भारती रतन शिकलगार, मुलगा गणेश संपत शिकलगार व सासू मंगल बकश शिकलगार (सर्व रा. वेताळपेठ) अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी उत्तम प्रकाश शिकलगार (वय ३३ रा. शिकलगार वसाहत कुरुंदवाड) यांनी फिर्याद दिली आहे.

येथील वेताळपेठ परिसरात संपत शिकलगार कुटुंबियांसह राहण्यास आहे. संपत शिकलगार याची पत्नी राखी हिने २५ फेब्रुवारी रोजी विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारासाठी प्रथम आयजीएम येथे तर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तर पत्नी राखी हिच्या मृत्यू झाल्याने अस्वस्थ बनलेल्या पती संपत शिकलगार याने इचलकरंजीकडे येत असताना अंकली पुलावरुन नदीत उडी घेवून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला वाचविण्यात आले होते.
सासरच्या मंडळीकडून राखी हिला त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून राखीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाऊ उत्तम शिकलगार याने फिर्याद दिली आहे.

‘त्या’ तरूणीची हत्या करणारा निघाला शेजारीच

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिंचवडच्या वाल्हेकरवाडी परिसरात एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री भररस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते, यात तिचा मृत्यू झाला होता. चिंचवड पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी वेगाने तपास सुरू केला. यात शेजाऱ्यानेच तरुणीची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

‘त्या’ तरूणीची हत्या करणारा निघाला शेजारीच, कारणही आलं समोर
कोमल भरत जाधव (वय १८) या तरुणीची रविवारी (दि.११) रात्री हत्या करण्यात आली होती. कोमल जाधव ही वाल्हेकरवाडीत कुटुंबासोबत राहत होती. कृष्णामाई परिसरात तिचे घर आहे. रविवारी कोमल घरात होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन जण आले. त्यांनी तिला घराबाहेर बोलावून घेतले. कोमल घरातून बाहेर आली. ती समोर येताच आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात तिचा मृत्यू झाला होता.

Web Title: Case registered against four for abetting married womans suicide ichalkaranji crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Ichalkaranji
  • police

संबंधित बातम्या

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त
1

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ
2

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
3

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला
4

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.