crime (फोटो सौजन्य: social media)
छत्रपती संभाजीनगर येथे पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना आधी महिलेवर बलात्कार केला त्यानंतर ती गर्भवती झाल्यानंतर बळजबरीने महिलेचा गर्भपात केल्याचं आरोप करण्यात आला आहे. तक्रार दाखल करण्यात आलेल्या आयुक्तांचा नाव भारत प्रभाकर राठोड असं आहे.
Latur News: पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल; अनेक वर्षांपासून होते प्रेम संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्यावर एका ३९ वर्षीय महिलेने अत्याचार केल्याचं आरोप करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष देत अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. भारत राठोड यांच्यासह विशाल राठोड, राहुल नावाचा त्याचा साथीदारावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. धक्कदायक म्हणजे तिन्ही वेळी आरोपीने बळजबरीने महिलेचा गर्भपात केल्याचे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. या संदर्भात संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दाखल केली आहे.
शाळेतील शिक्षिकेचा विद्यार्थ्याशी अश्लील प्रकार; इंस्टाग्रामवर करायची अर्धनग्न व्हिडीओ कॉल….
दरम्यान, नवी मुंबईतून येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी, संबंधित शिक्षिकेविरुद्ध नवी मुंबईतील कोपर खैराणे पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय प्रकार?
नवी मुंबई येथील एका शिक्षेकेने तिच्याच शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अश्लील व्हिडीओ कॉल केलं असल्याचं समोर आलं आहे. सादर शिक्षिका इंस्टाग्रामवर अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करत होती. याबाबतची माहिती विदयार्थ्याने त्याच्या पालकांना सांगितली. पालकांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी शिक्षिकेला अटक केली असता न्यायालयाने तिला एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे. या शिक्षिकेने शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत, आणखी कोणासोबत हे कृत्य केले का याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने शाळेत आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.