Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटस टोलनाक्याची तोडफोड करणे तरुणांना भोवलं; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

कोयता डोक्यात मारत असताना खोमणे यांनी हाताने अडवला असता हाताच्या बोटावर वार बसला. या हल्ल्यात खोमणे यांच्या हाताला मार लागल्याने ते जखमी झाले, अशी फिर्याद टोल कर्मचारी राहुल पांडुरंग खोमणे यांनी पोलिस ठाण्यात दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2026 | 12:21 PM
पाटस टोलनाक्याची तोडफोड करणे तरुणांना भोवलं; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

पाटस टोलनाक्याची तोडफोड करणे तरुणांना भोवलं; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पाटस : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस येथील टोलनाक्यावर कोयत्यांनी टोलनाक्याची तोडफोड करत एका टोल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी सहा तरुणांवर यवत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, दोघे जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

रमेश बाबाजी शेगर, शाहरुख बाबु शेख, अभिषेक सुधीर चौगुले (तिघे रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे), प्रसाद शंकर मेरगळ, (रा. बिरोबावाडी ता. दौंड, जि. पुणे) शुभम रामचंद्र मारणे (रा. कात्रत्र, पुणे), जीवन रविंद्र गायकवाड (रा. कानगाव ता.दौंड जि. पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यावर सोमवारी (दि. १३) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास टोल नाक्यावर लेन क्रमांक ४ वर चारचाकी स्विफ्ट कारमधून चार-पाच जण खाली उतरले. हातात कोयता आणि लोखंडी गजाने टोल बुथची तोडफोड करून दहशत निर्माण केली.

तोडफोड करून ते चार-पाच जण पुन्हा स्विफ्ट कारमध्ये बसून ४ नंबर लेनने सोलापूर बाजूकडे पुढे जाऊन परत वळून लेन नंबर ११ वर आली. यावेळी सहा जण गाडीतून खाली उतरून हातातील लोखंडी गज आणि कोयत्याने पुन्हा टोल बुथची तोडफोड केली‌. यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टोल कर्मचारी राहुल कर्मचारी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

कोयता डोक्यात मारत असताना खोमणे यांनी हाताने अडवला असता हाताच्या बोटावर वार बसला. या हल्ल्यात खोमणे यांच्या हाताला मार लागल्याने ते जखमी झाले, अशी फिर्याद टोल कर्मचारी राहुल पांडुरंग खोमणे यांनी पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी सहा जणांवर टोलच्या बुथची तोडफोड करून नुकसान करणे, जीवघेणा हल्ला करणे यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Case registered against youths who vandalized patas toll plaza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

अभिमानास्पद क्षण! प्रा. विलास कथुरे यांचा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारा’ने सन्मान
1

अभिमानास्पद क्षण! प्रा. विलास कथुरे यांचा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारा’ने सन्मान

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?
2

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
3

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
4

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.