
PDFA Legends Trophy
वानवडी येथील टर्फ-अप मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. सामन्याच्या ९ व्या मिनिटाला सुरज शेट्टी याने गोल करून चेंबुर संघाचे खाते उघडले. त्यानंतर अनुप नायर याने गोल करून अकतसुकी संघाला बरोबरी गाठून दिली. कृष्णा नायडू याने २७ व्या मिनिटाला गोल करून चेंबुर संघाला पुन्हा आघाडीवर नेले. जेसन वाझ याने ३६ व्या मिनिटाला गोल करून अकतसुकी संघाला २-२ अशी बरोबरी गाठून दिली. पूर्ण वेळ ही बरोबरीची कोंडी कायम असल्याने टायब्रेकपद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकमध्ये चेंबुर ओएसकडून कृष्णा नायडू याने तर, अकतसुकी संघाकडून विजयान अर्लंड आणि शनुप नायर यांनी गोल नोंदवून संघाचा विजय निश्चित केला.
Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे प्रायोजक आणि काका हलवाई उद्योग सुमहाचे संचालक समीर गाडवे आणि अस्मित फाटक, नगरसेवक साहील केदारी, शिवाजी केदारी, मुरलीधर कचरे, पीडीएफएचे सचिव प्यारेलाल चौधरी, पीडीएफएचे उपाध्यक्ष प्रदीप परदेशी, सीईओ अक्षय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएफएचे समिती सदस्य परेश शिवलकर, रवि भागसिंग, मॅथ्यु सुसैनाथन, ॲड. इशान कोल्हटकर आदि प्रमुख पाहूणे उपस्थित होते.
विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक
स्पर्धेतील विजेत्या अकतसुकी पुणे संघाला करंडक आणि २५ हजार रूपये तर, उपविजेत्या चेंबुर ओएस संघाला करंडक आणि १५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. स्पर्धेत मुंबईचे मदनपुरा युनायटेड, मुंबई मल्लु आणि चेंबुर ओएस यांच्यासह बीडचा बीड लेजेंड्स संघ सहभागी झाले आहेत. याशिवाय अल्फा लेजेंडस ऑरेंज आणि ब्ल्यु, पुणे व्हेटरन्स्, इट्स घाना, ओल्ड राईस, जोगा पुणे अ आणि ब, नो लिमिट्स संघ, अकतसुकी, स्कायहॉक्स् व्हेटरन्स्, किरकी व्हेटरन्स् आणि यंग हार्ट्स हे १६ संघ सहभागी झाले होते.
Loyola Football Cup 2026 मध्ये गोल्सचा धडाका अन्…; ‘या’ चार संघांचा दणदणीत विजय
वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट खेळाडू (४० वर्षावरील गट) : मोहनिश भामरे (चेंबुर ओएस);
सर्वोत्कृष्ट खेळाडू (४५ वर्षावरील गट) : अमर परदेशी (इट्स घाना);
सर्वोत्कृष्ट रक्षक खेळाडू : विग्नेश एस. (मुंबई मल्लुज्);
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : डेलझाद मरझबानी (अकतसुकी पुणे)