Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: वरोऱ्यात किरकोळ वादातून रक्तरंजित शेवट; मध्यस्थी करणाऱ्या 65 वर्षीय वृद्धाची दगडाने हत्या

वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे मजुरांच्या किरकोळ वादात मध्यस्थी करणाऱ्या 65 वर्षीय विश्वनाथ कांबळी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला एका तासात अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 14, 2026 | 02:57 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • नालेसफाईच्या कामावरून दोन मजुरांमध्ये वाद झाला.
  • मध्यस्थी करणाऱ्या विश्वनाथ कांबळी यांच्यावर आरोपीने दगडाने हल्ला केला.
  • शेगाव पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासात अटक केली.
चंद्रपूर: वरोरा तालुक्यातील शेगाव बु. परिसरात मंगळवारी सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला असून एका किरकोळ वादाचे पर्यावसान थेट हत्येत झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शेगाव येथील आष्टा बायपास रोडवर सकाळी आठ वाजेच्या सुमारास नालेसफाईचे काम सुरू असताना दोन मजुरांमध्ये शुल्लक कारणावरून जुंपली. हा वाद सोडवण्यासाठी स्थानिक रहिवासी विश्वनाथ परसराम कांबळी (६५) हे मध्यस्थी करायला गेले असता, वादाने अंध झालेल्या आरोपीने त्यांच्यावरच हल्ला चढवला.

काय घडलं नेमकं?

नागपूर जिल्ह्यातील दहेगाव जोशी येथील रहिवासी असलेल्या महेंद्र रमेश भुरे (३६) या आरोपीने विश्वनाथ कांबळी यांच्या डोक्यावर दगडाने सपासप वार करून त्यांना जागीच ठार केले. या भीषण घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित जमावाने त्याचा पाठलाग सुरू केला आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली. शेगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अत्यंत वेगाने चक्रे हलवली आणि अवघ्या एका तासाच्या आत आरोपी महेंद्र भुरे याला बेड्या ठोकल्या.

Buldhana Crime: थरारक हत्याकांड! चारित्र्याच्या संशयातून बापानेच केलं पोटच्या मुलीचं शीर धडावेगळं

या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून स्थानिक कंत्राटदारांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नालेसफाईचा हा ठेका एका माजी ग्रामपंचायत सदस्याच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात आला असून संबंधित ठेकेदाराकडे बाहेरून आलेल्या मजुरांच्या ओळखीचा कोणताही ठोस पुरावा किंवा माहिती उपलब्ध नव्हती. ठेकेदाराला यासंदर्भात विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची ओळख न पटवता त्यांना गावात कामावर ठेवणे किती घातक ठरू शकते, याचा प्रत्यय या घटनेने आला आहे.

शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल १०२ गावांची जबाबदारी असून अपुऱ्या पोलीस बळामुळे गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येथे तातडीने कर्मचारी वाढवावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे. घटनेची माहिती मिळताच चिमूर येथील फॉरेन्सिक टीम आणि चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत.

Thane Crime: ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: मृत व्यक्तीचे नाव विश्वनाथ परसराम कांबळी होते.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना वरोरा तालुक्यातील शेगाव बु. परिसरात घडली.

  • Que: आरोपीला किती वेळात अटक करण्यात आली?

    Ans: पोलिसांनी आरोपीला एका तासाच्या आत अटक केली.

Web Title: Chandrapur crime bloody end to a petty dispute in warora 65 year old mediator murdered with a stone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.