Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Kidney Trafficking: चंद्रपूरपासून कंबोडियापर्यंत किडनी तस्करीचं जाळं! ‘डॉक्टर’ बनलेल्या इंजिनिअरचा पर्दाफाश

चंद्रपूरपासून कंबोडियापर्यंत पसरलेल्या आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा मोठा खुलासा झाला आहे. इंजिनिअर असलेला कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू डॉक्टर असल्याचं भासवून गरिबांना आमिष दाखवत किडनी तस्करी करत होता.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 24, 2025 | 02:06 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इंजिनिअर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू किडनी तस्करी रॅकेटचा मुख्य एजंट
  • आतापर्यंत 12 जणांच्या किडनी कंबोडियात बेकायदेशीर विक्री
  • प्रत्येक व्यवहारामागे आरोपीला 1 लाख रुपयांचे कमिशन
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एका मुलाने कंबोडिया येथे जाऊन किडनी विकल्याचे समोर आले होते. आता याप्रकरणाचा मोठा किडनी रॅकेट समोर आला आहे. हा रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यातून सुरु होऊन देशातील पाच राज्यापर्यंत पसरून कंबोडिया येथे येऊन संपते. या संपूर्ण नेटवर्कच्या मुख्य एजंट याला सोलापुर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा उर्फ रामकृष्म मल्लेश सुंचू असे नाव आहे. तो पेशेने इंजिनिअर आहे. मात्र तो स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगायचा. प्रत्येक किडनी व्यवहारासाठी त्याला १ लाख रुपये इतके कमिशन मिळायचं, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आलीय.

Bengaluru Crime: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; भररस्त्यात अडकवत गोळ्या झाडून केली हत्या, नंतर थेट पोलीस ठाण्यात केले सरेंडर

आता पर्यंत १२ लोकांच्या विकल्या किडनी

कृष्णाच्या माध्यमातून जवळपास १२ लोकांनी कंबोडियातील ‘प्रेआ केत मेलीआ हॉस्पिटल’ (मिलिटरी हॉस्पिटल), फ्नॉम पेन्हमध्ये आपल्या किडनी विकल्या आहेत.कृष्णा गरजूंना, गरिबांना आणि कर्जबाजारी लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवत असे.

कृष्ण कसा बनला किडनी तस्कर?

आरोपी कृष्णा हा डॉक्टर नसून इंजिनिअर आहे. त्याचे खरे नाव रामकृष्ण मल्लेश सुंचू असे आहे. तो ओळख बदलून सोलापुरात राहत होता. कपड्यांच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर तो गुन्हेगारी विश्वात वळला. सुरुवातीला त्याने स्वतःची किडनी विकली, नंतर त्याला याचे नेटवर्क मिळाले. याद्वारे तो लोकांना किडनी विकण्यासाठी आमिष दाखवू लागला. प्रत्येक किडनी व्यवहारामागे कृष्णाला 1 लाख रुपयांचे कमिशन मिळत होते.

पाच राज्यांत पसरलंय रॅकेट, आता सोलापूर कनेक्शनही उघड

भारतातील अनेक राज्यांमध्ये ही टोळी सक्रिय होती, उदाहरणार्थ पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रातील चंद्रपूर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्याशीही कनेक्शन उघड झालंय.

चंद्रपुरातील रोशन कुडेसोबत काय घडलं?

चंद्रपुरातील शेतकरी रोशन कुडे यांनी २०२१ मधून दोन सावकारांकडून त्याने ५० हजार रुपये घेतले होते. ज्याची वसुली रक्कम व्याजासह ७४ लाख रुपये इतकी झाली होती. त्यांनी डोक्यावरील कर्जाचे ओझं कमी करण्यासाठी किडनी विकण्याचा मार्ग स्वीकारला. फेसबुकच्या माध्यमातून कुडे हा आरोपी कृष्णाच्या संपर्कात आला. कृष्णाने त्यांना ८ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. कोलकातामध्ये दोघांची पहिली भेट झाली, येथेच पहिली वैधकीय तपासणी करण्यात आली. यानंतर रोशनला कंबोडियामध्ये पाठवण्यात आलं आणि त्याची किडनी काढण्यात आली. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला, यानंतर एकूण सहा सावकारांना अटक करण्यात आली.

कृष्णाला न्यायालयात केले अटक?

मंगळवारी (23 डिसेंबर) कृष्णाला सोलापुरातून अटक करण्यात आली. त्याला रात्री न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळेस त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये आणखी काही मोठे चेहरे समोर येऊ शकतात अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करता आहे.

Uttarpradesh Crime: शिकवणीच्या नावाखाली घाणेरडा प्रकार! मौलवीकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: किडनी रॅकेटचा मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: कृष्णा उर्फ रामकृष्ण मल्लेश सुंचू, पेशाने इंजिनिअर.

  • Que: किडनी कुठे विकल्या जात होत्या?

    Ans: कंबोडियातील प्रेआ केत मेलीआ (मिलिटरी) हॉस्पिटलमध्ये.

  • Que: आरोपी लोकांना कसे जाळ्यात ओढत होता?

    Ans: सोशल मीडियाच्या माध्यमातून गरिब, कर्जबाजारी लोकांना पैशांचे आमिष दाखवून.

Web Title: Chandrapur kidney a kidney trafficking network from chandrapur to cambodia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • Chandrapur Crime
  • crime
  • Kidney Transplant

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई
1

Kalyan Crime News: आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?
2

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती
3

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास
4

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.